पत्रकारांना धमकी देणाऱ्या मुजोर खासदारावर कठोर कारवाई करा – गणेश देशमुख

पिलीव/ प्रतिनिधी

पत्रकारांवर दबाव आणणे, धमकावणे आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पिलीव पत्रकार संघाच्या वतीने माळशिरस पोलीस स्टेशन अंकित पिलीव औट पोस्टचे हवालदार स्वरूप शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.


शिवसेना ठाकरे गटातून आपण शिंदे गटामध्ये प्रवेश केला याबाबत प्रश्न विचारल्या कारणाने पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे,धमक्या देणे तसेच पत्रकारितेचे काम रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा निवेदनात गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पत्रकार हे समाजातील सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे काम करतात.मात्र अशा प्रकारे पत्रकारांना धमकावून त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत असेल, तर ही अत्यंत गंभीर व लोकशाहीला घातक बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून संजय दिना पाटील या खासदारावर तातडीने गुन्हा दाखल करावा व कायद्यानुसार कठोर कारवाई करावी,अन्यथा पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी दिला आहे. सदरच्या निवेदनावरती दामोदर लोखंडे,प्रा.संजय पाटील, प्रमोद भैस,अतुल नष्टे सुजित सातपुते,शाहरुख मुलाणी,रघुनाथ देवकर, विनोद लोखंडे,संजय रोकडे सतीश पारसे या पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *