औदुंबर खटावकर यांनी AK जिमच्या माध्यमातून पिलीवच्या वैभवात भर टाकली-संग्रामसिंह जहागीरदार
पिलीव/सुजित सातपुते
काल रामनवमीचा सण म्हणजेच आपल्या सर्वांना सत्य,धर्म,निष्ठा आणि प्रतिष्ठेचा संदेश देतो.भगवान श्री राम यांचे जीवन आदर्श आणि नैतिक मूल्ये शिकवते.या दिवशी रामचरितमानस पठण, भजन-कीर्तन आणि रामायण कथा आयोजित करणे अत्यंत शुभ मानले जाते.भगवान श्री रामाच्या आशीर्वादाने हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन येतो.अशीच एक काल पिलीवच्या वैभवात भर टाकणारी समृद्धी साधली आहे,माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील युवा उद्योजक तथा AK जिमचे ओनर औदुंबर भारत खटावकर यांनी काल रामनवमीचे औचित्य साधून स्वखर्चाने पिलीव येथे भव्यदिव्य अशी जिम सुरू केली आहे,सदर जिमचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले,यावेळी भारत रामदास खटावकर,मारुती रामदास खटावकर,दत्तात्रय रामदास खटावकर,शरद रामदास खटावकर,औदुंबर भारत खटावकर यांसह खटावकर परिवार व पिलीव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,जिममध्ये नियमित व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

शारीरिक ताकद वाढते,वजन कमी होते,स्नायू मजबूत होतात,तसेच डोक्याचा ताण-तणाव कमी होऊन सकारात्मकता वाढते,शारीरिक क्षमता वाढते,जिममध्ये विविध प्रकारच्या व्यायामामुळे स्नायू मजबूत होतात ज्यामुळे शारीरिक कार्यक्षमता वाढते,चरबी कमी होऊन वजन नियंत्रणात राहते,शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो,हृदयविकार,मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो,त्वचेला रक्तपुरवठा वाढतो,ज्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते,शरीर आणि मन शांत राहते,ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होतात,आत्मविश्वास वाढतो,जिममध्ये व्यायाम करणे हे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे,तर मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे,त्यामुळे नियमितपणे जिममध्ये व्यायाम करणे आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे AK जिमचे ओनर औदुंबर भारत खटावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,
शरीर हीच संपत्ती हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पिलीवसह परिसरातील तरुणांनी निर्व्यसनी राहून दररोज व्यायाम केला पाहिजे, औदुंबरने परिसरातील तरुणांना अगदी मापक फी मध्ये व्यायामासाठी एक व्यासपीठ उभं करून दिलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,
संग्रामसिंह जहागीरदार,माजी सभापती