बखर लाईव्हचे संपादक “उमेश घोंगडे” यांच्या संकल्पनेतून पिलीव येथील तरुणांनी राबविला स्तुत्य उपक्रम..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावचे सुपुत्र व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले बखर लाईव्ह या नामांकित अशा चॅनलचे मुख्य संपादक संपादक उमेश विष्णू घोंगडे यांच्या संकल्पनेतून शिवराज पुकळे युवाशक्तीच्या माध्यमातून पिलीव येथील तरुणांनी उन्हाळ्याची दाहकता जाणून,वाटसरूंना व शालेय विद्यार्थ्यांना पाणपोईची गरज भासत असल्याचे लक्षात घेऊन पिलीव-म्हसवड रोड वरती बायपास लगत शहीद भगतसिंग या नावाने पाणपोई सुरू केली असून थंडगार अशी पाणी पिण्याची सोय केली आहे,

सदर पानपोईचे उद्घाटन उपजिल्हाधीकारी अर्चना नष्टे,पोलीस उपनिरीक्षक पवार मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले,यावेळी माजी उपसरपंच आरीफखान पठाण,नानासाहेब देशमुख,ग्राम पं.सदस्य अविनाश जेऊरकर,भाजपा.यु.मो जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे,इंजि.शुभजीत नष्टे,मा.सरपंच अमोल मदने,मा.सरपंच नितिन माळी,भाजपा पिलीव पॅनल प्रमुख प्रमोद भैस,कुमारसिंग भैस,संतोष शेंडगे सर,उमेश सरवदे,नानासाहेब मदने पिलीव मधील सर्व पत्रकार आणि पोलीस बांधव तसेच राजकीय,सामाजिक व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.