आकाश खुर्द खून प्रकरणी तपासाला मिळणार कलाटणी : सुजित सातपुते घेणार पोलीस अधीक्षकांची भेट..!
पिलीव / प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द-पाटील वय 32 वर्ष ( अंदाजे ) या तरुणाचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून दिनांक 11 मार्च रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास गुप्तांगाला व इतर ठिकाणी लोखंडी सळईचे चटके देऊन निर्घुण व अमानुषपणे खून करण्यात आला होता,त्याच्या शरीरावरती न मोजण्या विपरीत जखमा दिलेले डाग उमटले होते, त्यानंतर त्याची मोटरसायकल व त्याचा मृत्यू देह माळशिरस-पिलीव रोड वरती पिलीव हद्दीत असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये निवस्त्र अवस्थेत टाकून देऊन संबंधित सर्व आरोपी तेथून फरार झाले होते,आकाशला इतक्या क्रूरतेने मारले होते की त्याचा मृतदेह बघितल्यानंतर त्याला एक दोघांनी मारले नसून किमान सात-आठ लोकांनी तरी याचा जीव घेतला असेल अशी परिस्थिती दिसून येत होती,परंतु या गुन्ह्यामध्ये फक्त तीनच आरोपींना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत,

आकाश हा पैलवान असल्याचे पिलीवसह परिसरातील लोकांना ज्ञात होते,त्यामुळे ऐन तिशीतल्या तरुण अशा पैलवानाला एक महिला,तिचा पती व तिचा अल्पवयीन भाऊ कसा मारू शकतो हा पिलीवसह परिसरातील सर्वांना चकित करणारा प्रश्न उद्भवला आहे,सदर गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक व्हावी म्हणून आकाशच्या समाज बांधवांनी पिलीव औट पोस्टला निवेदन ही दिले आहे,परंतु त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माझ्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपींनी पैशाच्या जोरावर आकाशचा खून पचविण्याचे सूक्ष्म नियोजन आखले असल्याचे आकाशची आई अनिता खुर्द-पाटील यांचे म्हणणे आहे ,

परंतु आकाशच्या 65 वर्षाच्या आईला 26 वर्षाच्या पत्नीला व 07 महिन्याच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांची भेट घेणार असून सदर गुन्ह्याचा तपास तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालून करावा व सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करून कठोरात-कठोर शिक्षा करावी अशी मी माझ्या स्वतःच्या लेटर पॅड वरती निवेदनाद्वारे विनंती करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सुजित सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,आणि त्यातूनही जर न्याय मिळाला नाही तर माळशिरस तालुक्याचा बीड जिल्ह्यात समावेश करा अशी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदनाद्वारे मागणी करणार असून सदर प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचेही सुजित सातपुते यांनी बोलताना सांगितले,
माझ्या एकुलत्या एक मुलाला यांनी जसे हाल-हाल करून मारले आहे तसेच यांचे पण हाल झाले पाहिजे,जे खरे आरोपी आहेत त्यांना अजून अटक झालेली नाही ते बाहेरच आहेत,त्यांनाही शिक्षा द्या व मला न्याय मिळवून द्या.
अनिता अंकुश खुर्द-पाटील,आकाशची आई