पिलीव गावचे सुपुत्र गणेश शिवाजीराव इंगळे यांची वन परिक्षेत्राधिकारी/RFO पदी नियुक्ती : दहावीच्या वर्ग मित्रांनी सन्मान करून दिल्या शुभेच्छा..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील अतिशय शांत,संयमी,प्रामाणिक व संवेदनशील म्हणून ओळख असणारे सेवानिवृत्त वनपाल अधिकारी शिवाजीराव इंगळे यांचे सुपुत्र गणेश शिवाजीराव इंगळे यांनी सन 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात कृषी सहाय्यक व वन परिक्षेत्राधिकारी अशा दोन्ही पदाला गवसणी घातली होती,परंतु 2018 मध्ये जगभर कोरोनाने धुमाकूळ घातल्या कारणाने वन विभागाच्या मुलाखती रखडल्या होत्या,त्यामुळे गणेश इंगळे यांनी कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक म्हणून सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तीन वर्ष काम पाहिले व काही दिवसांपूर्वी वन विभागाने मुलाखती घेतल्यानंतर त्यांची वन परिक्षेत्राधिकारी पदी निवड झाली असून ते येत्या दोन दिवसात चंद्रपूर या ठिकाणी आपल्या सेवेवर रुजू होणार आहेत,

वनपरिक्षेत्र अधिकारी(RFO) म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर जो वनसंरक्षणासाठी जबाबदार असतो.ते एक गणवेशधारी पोलीस अधिकारी असून,त्यांची भूमिका प्रशासकीय क्षेत्रात SDM किंवा मंडळ अधिकाऱ्यांसारखी असते.वनपरिक्षेत्र अधिकारी हे वन विभागात एक राजपत्रित पद आहे.ते वनसंरक्षण,अवैध वृक्षतोड आणि वन्यजीव संरक्षण यांसारख्या कामांसाठी जबाबदार असतात.RFO ला वन कायद्यानुसार अटक करण्याचा आणि गुन्हे नोंदवण्याचा अधिकार असतो.RFO हे खाकी गणवेश घालतात ज्याच्या खांद्यावर कोणत्याही पट्ट्याशिवाय तीन टोकदार तारे असतात,परंतु मी माझ्या वडिलांची जुनीच वर्दी कामावर घालणार असून त्यांना वनपाल असल्याकारणाने दोन स्टार होते परंतु मी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल पाळून रीतसर तिसरा स्टार वडिलांच्या जुन्या वर्दीवर लावला आहे,आणि तीच वर्दी घालून मी कामावर रुजू होईन,कारण माझ्या वडिलांच्या शरीरातला आणि वर्दीतला प्रामाणिकपणा मला काम करण्यास ऊर्जा देईल असे नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश इंगळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,त्यांच्या या निवडीबद्दल सन 2005-6 मधील इयत्ता दहावीच्या वर्ग मित्रांनी संदेश देशमुख यांच्या निवासस्थानी एकत्रित सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,यावेळी बँक ऑफ इंडियाचे कॅशियर माऊली बोडरे यांनी उपस्थित मित्रपरिवारांचे आभार मानले,
#माझ्या वडिलांनीही अनेक वर्ष अगदी प्रामाणिकपणे वनविभागात नोकरी केली आहे,त्यामुळे मला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे आणि त्यामुळेच मी आज इतक्या मोठ्या पदाला गवसणी घालू शकलो आहे,
गणेश इंगळे, वनपरिक्षेत्राधिकारी