भाजप युवा मोर्चा माळशिरस तालुका सोशल मीडिया संयोजकपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्याची भाजप युवा मोर्चा ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली यावेळी माळशिरस तालुक्यातील पिलीव गावचे रहिवासी असलेले तसेच आमदार रामभाऊ सातपुते यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे गणेश देशमुख यांची भाजप युवा मोर्चा माळशिरस तालुका संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित भाजप युवा मोर्चा माळशिरस तालुका अध्यक्ष शिवराज पुकळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीचे पत्र सुपुर्द केले गेले आहे. यावेळी बोलताना गणेश देशमुख यांनी सांगितले की भाजपा सरकारने ज्या काही सर्वसामान्यांसाठी जनहिताच्या नविन योजना आणल्या आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचतील याकडे अधिक लक्ष देणार असून गाव तेथे पक्ष व घर तेथे कार्यकर्ता हा पॅटर्न राबवणार आहे,