उद्यापासून पिलीव ग्रामोत्सव २०२४ ची मेजवानी सुरु : रसिकांना मिळणार सलग तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची खैरात..!
पिलीव/सुजित सातपुते
पिलीव ग्रामोत्सव २०२४
सालाबादप्रमाणे यंदाही पिलीव ग्रामोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे,आपल्या या ग्रामोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे दिनांक २४/०१/२०२४ वार बुधवार रोजी सकाळी ६:००वाजता पिलीव मॅरेथॉन स्पर्धेने ग्रामोत्सवाला सुरूवात होईल.प्रथम महिला मॅरेथॉन स्पर्धेत खालील गटानुसार स्पर्धा होणार आहेत.
“पहिला गट”
१) इयत्ता पहिली ते पाचवीतील मुली “दुसरा गट”
२) इयत्ता सहावी ते नववीतील मुली “तिसरा गट”
३) दहावी ते पुढे खुला महिला
वरील गटानुसार उद्या दिनांक २४/०१/२०२४ बुधवारी सकाळी ६:०० वाजता पिलीव बचेरी चौक येथून स्पर्धेला सुरुवात होईल,नंतर त्याच दिवशी दुपारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलीव याठिकाणी दुपारी एक ते दोन या वेळेत “पाककृती स्पर्धा”आयोजित करण्यात आली आहे,या स्पर्धेत फक्त रवा व तांदूळ यापासून तयार केलेले पदार्थ घेण्यात येतील नंतर त्याच दिवशी दुपारी २ ते ३:३० या वेळेत मुली व महिला यांच्या “रांगोळी स्पर्धा होतील” व नंतर महिलांसाठी “फनी गेम्स” होईल यामध्ये बॉल पास करणे,चुरमुरे फुटाणे गेम,संगीत खुर्ची अश्या विविध प्रकारच्या स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलीव याठिकाणी दुपारी एक पासून सुरू होतील.
पिलीव ग्रामोत्सव चा दुसरा दिवस दिनांक २५/०१/२०२४ वार गुरूवार या दिवशी सकाळी ६:०० वाजता “पुरुष मॅरेथॉन स्पर्धा” या स्पर्धा चार गटात होतील,
१) पहिला गट – “इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थी”
२) दुसरा गट – “इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थी
३) तिसरा गट – “इयत्ता दहावी ते पुढे खुला गट” व पुढचा “जेष्ठ नागरिक गट” अशा पुरुष मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत.
पिलीव ग्रामोत्सव चा तिसरा दिवस
“सांस्कृतिक कार्यक्रम”
सांस्कृतिक कार्यक्रम दि.२६/०१/२०२४ वार शुक्रवार रोजी सायंकाळी बरोबर ५:०० वाजता आर्वे मैदानावर होणार आहे, तरी पिलीव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व महिला भगिनींनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे जहागीरदार पार्टीचे महासचिव समशेरसिंग राजपूत यांनी माळशिरस टाईम्स च्या माध्यमातून आवाहन केले आहे.