उद्या पिलीव नगरीत होणार विविध विकास कामांचे उद्घाटन : सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे सरपंच नितीन मोहिते यांचे आवाहन..!
पिलीव/सुजित सातपुते
उद्या शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री विजयसिंह मोहिते-पाटील, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सदस्य मा.श्री रणजीतसिंह मोहिते-पाटील,माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते पिलीव येथील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे.

यामध्ये महात्मा फुले शॉपिंग सेंटर नूतन इमारत,आमदार राम सातपुते व आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या फंडातून आलेल्या पिलीव पेठेतील रस्त्याचे भूमिपूजन,जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन,बाजार तळावरती मच्छी मार्केटच्या पूर्ण झालेल्या दोन गाळ्यांचे उद्घाटन,संत सावता माळी सभामंडप उद्घाटन व इतर विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार असून सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शिवामृत दूध संघाचे चेअरमन मा.श्री धैर्यशील मोहिते पाटील,माजी सभापती मा.श्री संग्रामसिंह जहागीरदार,माजी उपसभापती मा.श्री अर्जुनसिंह मोहिते-पाटील,अकलूज गावचे मा.सरपंच मा.श्री शिवतेजसिंह मोहिते-पाटील,मा.जिल्हा परिषद सदस्य मा.श्री गणेश पाटील,मा.पंचायत समिती सदस्य सौ.ताई महाडिक यांची उपस्थिती राहणार असून पिलीव नगरीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे.असे पिलीव गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन मोहिते यांनी माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून आवाहन केले आहे.