एक सच्चा समाजसेवक बाबा आमटे…!
पिलीव/सुजित सातपुते

बाबांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी सांगण्यासारखं बरच काही आहे, अंध अपंग, मूकबधिर, कर्णबधीर सर्वच दिव्यांगाना मायेची सावली देणारे बाबा कुष्ठरोगीसाठी तर ते देव माणूस होते .“या संसारातील काही लोक स्वतःसाठी जगतात तर काही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात काही लोक समाजासाठी जगतात, असे जीवन जगणारे फार थोडे व्यक्ती या जगात आहेत.
जन्म
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात २६, डिसेंबर १९१४ रोजी झाला.त्यांचा कार्याचा गौरव म्हणुन गुगल सर्च इंजिन ने डुडल काढले आहे.
शिक्षण : बी.ए. एल्एल.बी.ही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला.
पत्नी आणि मुले परिवाराची त्यांना फार सहाय्यता मिळाली त्यांची पत्नी इंदु घुले ज्यांना ते साधना असे म्हणत त्यांनी फार सोबत केली. नेहमी त्या बाबांच्या पाठीशी राहील्या.अपत्ये प्रकाश आमटे, विकास आमटे
पुरस्कार आणि साहित्यिक
पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार, सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते. सतत कामात असूनही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’आणि माती जागवील त्याला मत’हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते.
आनंदवनाची निर्मिती : एखादा जोरदार पाऊस होता, विजेचा कडकडाट होत होता. मुरलीधर घराकडे परतत होता. एका कोपऱ्यातून कोणी तरी वेदनेनं विव्हळत असल्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला.ते थांबले आणि पहिले तर एक विद्रुप असा हातपायाची बोटे वेडी वाकडी झालेला माणूस त्यांना दिसला ते दचकले आणि घाबरले मनात तरे तरेचे विचार येत होते .आपण ही जर त्याच मानवाच्या जागी असतो ? तर काय झाले असते .आपण ही त्याला मदतीचा हात दिला पाहिजे .परंतु
मुरलीधर माहीत न्हवते की तो कुष्ठरोगी आहे.आणि जेव्हा माहीत झाले तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोगी साठी अभ्यास चालू केला त्या काळात कृष्ठरोग हे मागील जन्माच्या पापाचं फळ समजलं जात होतं. त्यामुळे जर कुणाला कृष्ठरोग झाल असेल तर त्याचा बहिष्कार केला जात असे १ आजारी गाय, साधनाताई आमटे, दोन लहान मुलं विकास आणि प्रकाश आणि सोबत सात कुष्ठरोगी घेऊन बाबांनी वरोराच्या जंगलात 1951 साली एक नवीन विश्व उभारले. त्याचं नाव “आनंदवन” संस्था. “महारोगी सेवा समिती”. 14 रुपयेपासून सुरू झालेला हा प्रवास आज खूप मोठ्या टप्प्यावर पोहचला आहे.आणि त्यांची मुले ती जबाबदारी मोठ्या हिमतीने पार पाडत आहेत थोरले पुत्र विकास आमटे व त्यांची पत्नी भारती आमटे आनंदवनातील हाॅस्पीटल ची जवाबदारी सांभाळतात.आनंदवन येथे एक युनिव्हर्सिटी एक अनाथाश्रम आणि अंध व गोर गरीबांच्या मुलांसाठी शाळा आहे. आजही स्वसंचालीत आनंदवन आश्रमात जवळपास 5000 लोक राहतात.डाॅ. प्रकाश आमटे हे आपल्या पत्नी डाॅ. मंदाकिनी सोबत गडचिरोली येथील हेमलकसा गावात मदिया गोंड जमातीच्या लोकांसाठी एक शाळा व एक हाॅस्पीटल चालवतात.
महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली
कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापल्या :
आनंदवन – वरोरा (चंद्रपूर), सोमनाथ प्रकल्प – मूल (चंद्रपूर), अशोकवन – नागपूर, लोकबिरादरी प्रकल्प – हेमलकसा
) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली.भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला.
कुष्ठरोग्यांना योग्य सामाजिक स्थान मिळविण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली. त्यांनी 15 आॅगस्ट 1949 रोजी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली, त्यांना त्यांनी नंदनवन हे नाव दिले येथे कुष्ठरोग्यांना राहण्या व उपचाराची सोय उपलब्ध होती त्यासोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली.
1973 साली गडचिरोली जिल्हयातील मदिया गोंड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटीत करून त्यांनी लोक बिरादरी प्रकल्प स्थापन केला
समिधा आत्मचरित्रपर पुस्तकातून बाबा विषयी महिती
साधनाताईंनी लिहिलेल्या ’समिधा’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणार्या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो. ’समिधा’तून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्यासमोर येतो.
बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते.
सामाजिक उपक्रम आणि आंदोलन
गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरम्ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
.या महान समाज सेवकाचा 9 फेब्रुवारी 2008 मध्ये वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने (blood cancer) मुळे निधन झाले.