उद्या पिलीव येथे होणार शिवराज पुकळे युवाशक्ती आयोजित शिवनेरी दहीहंडी महोत्सव : “गोविंदा आला रे” च्या घोषणांनी पिलीव परिसर दुमदुमणार..!

पिलीव/सुजित सातपुते

बाळगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते.श्रीकृष्णाला बालपणी दही,दूध,लोणी या पदार्थांची आवड होती.कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे.यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असत.या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.याच अनुषंगाने उद्या रविवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील शिवराज पुकळे युवाशक्तीच्या वतीने शिवनेरी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवनेरी दहीहंडी महोत्सवामध्ये 111111 रुपये इतके पारितोषिक असून आकर्षक बक्षीस 75000 रुपये तर 51000 हजार रुपये दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून ठेवले असल्याचे शिवराज पुकळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर व मुंबई आयकर आयुक्त सचिन मोठे उपस्थित राहणार असून प्रमुख आकर्षण म्हणून चंद्रा फेम,बाळूमामाच्या नावानं चांगभलं फेम सुमन,रिल्स स्टार विनोद यादव व लोटके यांचा डीजे तर निवेदक म्हणून लखनराज खांडेकर यांची उपस्थिती राहणार असल्याचे पुकळे यांनी सांगितले.सदरची दहीहंडी सायंकाळी 6:00 वाजता पिलीव- बचेरी रोड लगत असणाऱ्या आर्वे मैदानावर होणार आहे.तरी पिलीव सह परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी हा शिवनेरी दहीहंडी महोत्सव पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन शिवराज पुकळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *