त्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ पिलीव कडकडीत बंद:सकल मराठा समाजाला इतर समाजाचाही पाठिंबा..!

पिलीव/सुजित सातपुते

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह समाजाच्या इतर हिताच्या मागण्यासाठी आंदोलनास बसलेल्या मराठा समाज बांधव व माता-भगिनींवर अमानुषपणे झालेल्या गोळीबार व लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे आज बुधवार दिनांक ०६ सप्टेंबर रोजी बंद पाळण्यात आला होता.

यावेळी मा.सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीवच्या मुख्य पेठेतून सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने निषेध रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये मराठा समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी परिसरातील इतर समाजातील ही विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बंदच्या निषेधार्थ पिलीव परिसरातील सर्व व्यापारी वर्गांनी या बंदला सहकार्याची भावना ठेवून बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे पिलीव परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद अवस्थेत होती या बंदला कसल्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून आंदोलनकर्त्यांनी विशेष काळजी घेऊनच निषेध राहिली काढली होती.यावेळी संग्रामसिंह जहागीरदार,शहाजी महाडिक,राजेंद्र करांडे,मनोज कदम,डॉ.सागर जाधव,डॉ.निलेश कांबळे. डॉ. मगर,विशाल जाधव जाधव,डॉ दिलीप पवार,मोहन करांडे,अशोक घोंगडे, शिवाजी इंगळे,तुषार जाधव,विशाल भोसले,उदय कदम,डॉ.रणजीत काटकर,अविनाश जेऊरकर,समशेरसिंग राजपूत,मोहसीन शेख,रणधीरसिंग जामदार यांसह पिलीव परिसरातील विविध मान्यवर सदर रॅलीमध्ये उपस्थित राहून निषेध नोंदवताना पहावयास मिळाले.निषेध रॅली प्रसंगी प्रोटोकॉल नुसार पिलीव पोलीस चौकीचे उपनिरीक्षक एम.एम पुजारी,अभिजीत कणसे,पंडित मिसाळ,अमित जाधव,सतीश धुमाळ, दत्ता खरात यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

माळशिरस तालुक्यामध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मंगळवार दिनांक ०५ सप्टेंबर रोजी बंद पुकारण्यात आला होता.परंतु या दिवशी आपल्या पिलीव गावचा आठवडी बाजार असल्यामुळे व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही पिलीव बंदचे मंगळवार ऐवजी बुधवारी नियोजन केले.
“संग्रामसिंह जहागीरदार”
मा,सभापती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *