पिलीव येथील प्रज्ञा काँम्पुटर & ई-सेवा केंद्राच्या विद्यमाने रणजित सातपुते यांच्यावतीने बांधकाम कामगारांना मोफत सेफ्टी किटचे वाटप..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्रज्ञा कॉंम्प्युटर अँड ई-सेवा केंद्र एसटी स्टँड पिलीव श्री.स्वामी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे आर्वे कॉम्प्लेक्स येथे गेल्या चार महिन्यापासूनच सुरू झालेल्या शासन मान्यता प्राप्त केंद्राच्या विद्यमाने पिलीव,शिंगोर्णी,बचेरी,चांदापुरी,पठाण वस्ती,कुसमोड,कोळेगाव,फळवणी,कुसमोड,झिंजे वस्ती यांसह इतर परिसरातील नोंदीत व अधिकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांना मोफत सेफ्टी कीटचे वाटप करण्यात आले.सदरच्या सेफ्टी कीटमध्ये पाठीवर अडकवली जाणारी बॅग,काम करताना घालण्यासाठी लागणारे एक जॅकेट,हेल्मेट,जेवणासाठी चार ताळ्यांचा डब्बा,पायात घालण्यासाठी बूट,सोलर टॉर्च,सोलर चार्जर,पाणी पिण्यासाठी लागणारी बॉटल,चटई,मच्छरदाणी जाळी,इमारतीवर काम करताना लटकण्यासाठी लागणारा बेल्ट आशा विविध वस्तूंचा समावेश आहे.ज्या बांधकाम कामगारांना आपली रीतसर नोंदणी करावयाची आहे त्यांनी वयाचा पुरावा,रहिवासी पुरावा,आधार कार्ड,नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचा पुरावा,पासपोर्ट साईज तीन फोटो व बँकेचे पासबुक घेऊन प्रज्ञा कॅम्पुटर अँड ई-सेवा केंद्र येथे संपर्क साधण्याचे आवाहन रणजीत सातपुते यांनी केले आहे.नोंदणी केल्याने सामाजिक सुरक्षेच्या योजना,शैक्षणिक योजना,अर्थ सहाय्य योजना यांसह इतर शासकीय योजनांचा भरघोस असा लाभ मिळतोय त्यामुळे सर्व बांधकाम कामगारांनी आपली रितसर नोंदणी करून घेणे आवश्यक असल्याचेही सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ज्यांना शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी 9730303830 या क्रमांकावर संपर्क साधून आपली अधिकृतपणे कामगार नोंदणी करुण घ्यावी.
रणजित सातपुते,पिलीव