पिलीव येथील मानाचा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या अष्टविनायक गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी तुषार उर्फ नाना जाधव यांची निवड..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील मानाचा गणपती म्हणून परिसरामध्ये ओळख असलेल्या अष्टविनायक गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी तुषार उर्फ नाना जाधव तर उपाध्यक्षपदी आदित्य गबाळे व तन्मय काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.मंडळातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक,डान्स अकॅडमी,झांज पथक,ढोल-ताशा पथक,श्री गणेशाची मिरवणूक,गणेश विसर्जन यांसह इतर विविध प्रश्नांवर चर्चा व नियोजन करण्यासाठी परवा अष्टविनायक गणेश मित्र मंडळाच्या सर्व सभासदांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.याच बैठकीमध्ये सर्व सभासदांच्या उपस्थितीत सदरच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.अनेक वर्षांपासून पिलीव परिसरामध्ये या मंडळाची कसलेही गालबोट न लागता पारंपारिक पद्धतीने झांज पथक व ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशाच्या मूर्तीची मिरवणूक पार पडते.यंदाही अशाच पारंपारिक पद्धतीने मिरवणूक निघेल व मंडळाचे सर्व सभासद शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व अटिंचे पालन करतील असे नवनियुक्त अध्यक्ष तुषार जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.यावेळी मंडळाचे संस्थापक अविनाश जेऊरकर,मार्गदर्शक प्रकाश जाधव,मंडळाचे सल्लागार ॲड.वैभव मेथवडे व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.