अकलूजचा “पंकज लोंढे” झाला तालुका कृषी अधिकारी…!
पिलीव/प्रतिनीधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कृषी सेवा पदांसाठीच्या परीक्षेसाठी अकलूजचा सुपुत्र पंकज सचिन लोंढे याची तालुका कृषी अधिकारी (वर्ग-२) या पदावर निवड झाली आहे. त्याने अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये पाचवे स्थान प्राप्त केले आहे .सध्या कोरेगाव तालुक्यामध्ये मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सचिन वसंत लोंढे यांचा पंकज लोंढे हा मुलगा असून त्याने राहुरी येथे नुकतेच एम. एस्सी. (कृषी) पूर्ण केलेले आहे. पंकजचे प्राथमिक ते माध्यमिकपर्यंतचे शिक्षण सातारा येथील रयत हायस्कूलमध्ये झालेले असून बीएससी ऍग्री अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयामध्ये पूर्ण केलेले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो सध्या राहुरी येथे आहे .पहिल्याच प्रयत्नात त्याने घवघवीत यश प्राप्त केले असून पुढील काळामध्ये आणखी वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदासाठी प्रयत्न करणार असल्याचे पंकजने सांगितले. पंकजच्या या यशामध्ये त्याने आपली आई- सौ.मनिषा,वडील सचिन लोंढे ,आजी सुभद्रा लोंढे चुलते प्रविण लोंढे सर, तुषार लोंढे व सर्व कुटुंबीय व मित्र परिवार आणि शिक्षकवर्ग यांचा वाटा असल्याचे नमूद केले. पंकजच्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.