फळवणी येथे भक्तीमय वातावरणात गाईचे प्रथम पुण्यस्मरण केले साजरे : ज्योतीराम आवताडे या गो प्रेमी शेतकर्याचे सर्वत्र होत आहे कौतुक…!

पिलीव/प्रतिनीधी

जगात लेकराचे हित फक्त माऊली बघत असते.त्यामुळे संतांनीही प्रथम क्रमांक आईला दिला आहे.आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही.जसे आपली आई असते तसेच भारत माता,गंगा माता व गो माता असते.३३कोटी देवांचे स्थान गोमाते मध्ये आहे त्यामुळे मातेला अनन्यसाधारण महत्व आहे असे विचार ब्रम्हचैतन्य गोपाळ महाराज वासकर यांनी फळवणी ता माळशिरस येथे मांडले.
फळवणी येथील शेतकरी, गो प्रेमी ज्योतीराम आवताडे यांच्या खिलार गाईचे गतवर्षी निधन झाले होते.

महाराष्ट्र राज्यासह कर्नाटकात या गाईचा प्रदर्शनात अनेक वेळा प्रथम क्रमांक आला होता.या गाईने आपल्या मालकाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात तसेच कर्नाटकात ही गाजवले होते तिचे गेल्या वर्षी निधन झाले होते.आज तिच्या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी ब्रम्हचैतन्य गोपाळ अण्णा वासकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते.
यावेळी सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन शेषगीरीराव यांच्या हस्ते आरती करण्यात आला.यावेळी तांदुळवाडीचे प्रगतशील बागायतदार अनिल चव्हाण,सुनिल चव्हाण फळवणीचे माजी सरपंच सचिन पाटील यांसाठी महाराष्ट्र,कर्नाटक राज्यातील हजारो गो प्रेमींनी उपस्थिती लावली होती.

चौकट :- जोतिराम आवताडे यांनी गाईच्या पुण्यस्मरणार्थ केलेला कार्यक्रम हा निश्चितच शेतकरी आणि मुक्या प्राण्यातील प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे.सद्गुरू कारखान्यावर ही सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक गाईंचा सांभाळ केला जातो.

एन शेषगीरीराव
चेअरमन सद्गुरू श्री श्री साखर कारखाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *