पिलीवसह परिसरातील खेळाडूंना शासकीय क्रिडा संकुल उपलब्ध करून देणार – राजेंद्र करांडे

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीवसह परिसरातील खेळाडूंची क्रिडा संकूलावाचून हेळसांड होत असल्याने आपल्या अंगी असणारे खेळ अवगत ठेवण्यासाठी किंवा सराव करण्यासाठी खेळाडूंना हक्काचे असे संकुल उपलब्ध नाही.

त्यामुळे अनेक खेळाडूंच्या अंगी विविध खेळांचे कौशल्य असूनही त्यांना व त्यांच्या कौशल्याला वाव मिळत नाही.त्यामुळे मी आदरणीय संग्रामसिंह जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून परिसरातील खेळाडूंना शासकीय क्रीडा संकुल मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेंद्र करांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.भिमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त विराट क्रिकेट क्लब मार्फत महेश वाघमारे व संजय (बाबा) करडे यांनी भव्य हाप पीच वन डे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.याच स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी करांडे बोलत होते.यावेळी समशेरसिंग राजपूत,नानासाहेब मदने,तानाजी लोखंडे,माजी सरपंच आप्पासाहेब लोखंडे,रणधीरसिंग जामदार,सारंग बनसोडे,सुरज काटकर,दिनेश लोखंडे यांसह विविध मान्यवर व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *