पिलीव पत्रकार संघाच्या वतीने प्रणीत सरवदे याचा सत्कार..!

पिलीव/प्रतिनिधी

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्रणीत नागेश सरवदे याने राहुरी विदयापिठाअंतरगत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 86 किलो वजन गटात दुसरा क्रमांक मिळविला असुन त्याची अॉल इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

याबद्दल प्रणीतचा पिलीव पत्रकार संघ व ग्रामस्थांनच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार दामोदर लोखंडे, रघुनाथ देवकर, संजय पाटील, प्रमोद भैस, उदय कदम, अभिजीत तावरे, तसेच उमेश सरवदे,नागेश सरवदे ,तानाजी लोखंडे, सागर लोखंडे, अप्पासाहेब लोखंडे, सिताराम धायगुडे यांच्या सह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .यावेळी पत्रकार रघुनाथ देवकर व दामोदर लोखंडे यांनी प्रणीतला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. फोटो – पिलीव पत्रकार संघाच्या वतीने प्रणीत सरवदे हयाचा सत्कार करताना पत्रकार दामोदर लोखंडे, रघुनाथ देवकर, संजय पाटील, प्रमोद भैस व इतर मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *