केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ.रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मातोश्री वृध्दाश्रमात भोजन वाटप : सचिन कुमार भोसले यांचा 20 वर्षापासूनचा स्त्युत्य उपक्रम..!

पिलीव/सुजित सातपुते

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार तथा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री वृद्धाश्रम (गोपाळपूर) येथे मिष्ठांन्न भोजन रविवार दिनांक २५/१२/२०२२ रोजी दुपारी ११ .३० वाजता करण्यात येणार आहे.आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त असे सामाजिक उपक्रम आठवले यांचे पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावचे अतंत्य विश्वासू समजले जाणारे कुमार भोसले यांनी 20 वर्षापासून अखंडीत सुरु ठेवले असून येथून पुढेही कुमार भोसले यांचे सुपुत्र सचिन कुमार भोसले (आर.पी आय.पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष) सुरु ठेवणार असल्याचे सचिन भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.आठवले साहेबांना दिर्घायुष्य लाभण्यासाठी वृद्धाश्रमातील वृध्दांचा आशिर्वाद मिळावा हिच आमची प्रांजळ इच्छा असल्याचे सचिन भोसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *