पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांचा बाजार दिवस उत्सहात साजरा : पालकांचा उत्सपुर्त प्रतिसाद..!

पिलीव/प्रतिनीधी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव येथे आज शनिवार दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी विद्यार्थ्यांना खरेदी विक्री , नफा तोटा याविषयी माहिती मिळावी व प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी बाजार दिवसाचे आयोजन केले होते. त्यातमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालेभाज्या, फळभाज्या, फळे , खाद्यपदार्थ, शैक्षणिक साहित्य तसेच सौंदर्य प्रसाधने इत्यादींची विक्री केली व त्यातून खरेदी विक्री चा आनंद घेतला. बाजार दिवसाचे उद्‌घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कापसे सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पर्यवेक्षिका मोरे मॅडम , वरिष्ठ लिपिक भोरकडे सर, पाटील सर, काळे सर, माने सर, वाघमारे सर, लिंगे मॅडम,जरे मॅडम , सर्व शिक्षक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी व विद्यार्थ्यांनी भरविलेला बाजार पाहण्यासाठी उपस्थित होते .बाजार दिवसाचे आयोजन श्रीमती हिरके मॅडम यांनी केले. तसेच कला व कार्यानुभव चे प्रदर्शन घेतले याचे आयोजन श्रीमती आठरे मॅडम यांनी केले.सदरच्या योग्य व अचुक नियोजनामुळे हिरके मॅडम आणि आठरे मॅडम यांचे विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री.कापसे सर यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *