डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द वापरले प्रकरणी माळशिरस कोर्टाने आरोपीचा जामीन फेटाळला – ॲड. सुमित सावंत
माळशिरस/प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द आणि शिवराळ भाषा वापरले प्रकरणी माळशिरस येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश श्री. एम. एन. पाटील यांनी आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला असल्याचे ॲड.सुमित सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे पिराळे ता. माळशिरस येथील व्हॉट्स ॲप ग्रुपवर दिनांक 21/04/2022 रोजी 7 मिनिटे 58 सेकंदाची आरोपीचे संभाषण असलेली ऑडियो रेकॉर्डिंग क्लिप वायरल झाली होती, त्यामध्ये आरोपीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी अपशब्द आणि शिवराळ भाषा वापरल्या बाबत ची फिर्याद पिराळे येथील श्री. प्रमोद शिंदे यांनी नातेपुते पोलिस ठाण्यात केली होती, नातेपुते पोलिसानी आरोपीस अटक करून मे. कोर्टात हजर केल्यावर आरोपीने नियमित जामीन अर्ज दाखल केला होता, आरोपी तर्फ तो मनोविकृत असलेबाबत तसेच सदर गुन्ह्यात अट्रोसिटी कायदा लागू होत नसले चा बचाव घेण्यात आला होता. आणि सदर गुन्हा सार्वजनिक ठिकाणी नसल्याचे सागितले. त्यास सरकारी वकील यांनी विरोध करत गुन्हा गंभीर स्वरूपाचा आसून तपास पुर्ण झाला नसल्याने अर्ज ना मंजूर करण्याची विनंती केली, मूळफिर्यादी तर्फे ॲड. सुमित सावंत यांनी आरोपी मनोरुग्ण नसल्याचे आणि सदर गुन्हात अट्रोसिटी लागू होत असल्याचे निदर्शनास आणून दिले, सदर युक्तिवाद गृहीत धरून मे. कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.
या केस मध्ये सरकारी वकील म्हणुन ॲड. संग्राम पाटील यांनी काम पाहिले तर फिर्यादी तर्फे ॲड. सुमित सावंत यांनी काम पाहिले.