एक दिवस सैनिकांनासाठी हा कार्यक्रम तरंगफळ ग्रामपंचायतमध्ये साजरा..!
तरंगफळ /युवराज नरोटे
भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याने संपूर्ण देशभर “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव “साजरा केला जात आहे,या निमित्त आजी/माजी सैनीक सत्कार कार्यक्रम शनिवार दि 30/04/2022 रोजी सकाळी 10 -00 वा ग्रामपंचायत कार्यालय तरगफळ येथे संपन्न.
सोलापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा दिलीपजी स्वामी साहेब, ग्रा प विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे साहेब, तसेच पंचायत समिती माळशिरस गटविकास अधिकारी श्रीकांतजी खरात साहेब, विस्तार अधिकारी खरात साहेब,कोळेकर साहेब,ढोके साहेब याच्या मार्गदर्शनाखाली तसेच तरंगफळ गावचे चे प्रथम नागरिक सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे, उपसरपंच वाघमोडे ताई ,मा उपसरपंच अवि काका तरंगे,ग्रा. सदस्य महादेव गोरड, पत्रकार युवराज नरुटे, गोविंद कांबळे, लालासो तरंगे, तसेच सन्माननीय सर्व सदस्य तसेच तरंगफळ गावचे सुजान नागरिक याच्या सहकार्याने एक दिवस सैनिकासाठी या कार्यक्रमासाठी गावातील आजी माजी सैनिक याचा सन्मान कार्यक्रम संपन्न ग्रामपंचायत तरंगफळ येथे संपन्न झाला, कार्यक्रमाला गावातील माझी सैनिक मेजर शिवाजी मुकीदा कांबळे व प्रशांत गेंड याच्या मातोश्रीं मनिषा गेंड यांचा सन्मान करण्यात आला या साठी जि प शाळा मुखयाधपक शेटे सर तसेच अंगणवाडी सुपरवायझर लोहकर मॅडम तसेच अंगणवाडी सेविका शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते,
अशी माहिती पानसरे भाऊसाहेब यांनी दिली