निमगाव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आशिष घुगे याचे शासनाच्या इंस्पायर अवार्ड उपक्रम अंतर्गत विज्ञान उपकरणाची राज्यस्तरावर निवड..!
निमगाव/प्रतिनिधी
निमगाव विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर कॉलेज निमगाव या प्रशालेचा इयत्ता नववी चा विद्यार्थी कु.आशिष राजाराम घुगे याने त्याचे उपकरण शासनाच्या इन्स्पायर अवॉर्ड स्कीम अंतर्गत 2021 ऑटोमॅटिक स्टॅन्ड फॉर हॅंडीकॅप बाईक या उपकरणा ची माळशिरस तालुक्यातून एकमेव शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे

व राज्य स्तरावर परीक्षणासाठी त्याचे उपकरणाची निवड झाल्याबद्दल त्याचा सन्मान संस्थेतर्फे व प्रशाले तर्फे करण्यात आला त्याचा सन्मान संस्थेचे संचालक व निमगाव चे माजी सरपंच श्री हनुमंत पवार सर यांच्या शुभहस्ते आणि संस्थेचे संचालक मल्लसम्राट पै.रावसाहेब मगर यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक राजेश सुरवसे यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीनिवास इनामदार यांनी केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक मल्लसम्राट पै.रावसाहेब (आप्पा) मगर उपस्थित होते तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक रामचंद्र आसबे ,मधुकर शिंगटे ,सुश्रिया इनामदार ,आदर्श प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा सचिन मगर आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार धनाजीराव जाधव यांनी मानले तसेच या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर स्टाफ विद्यार्थी उपस्थित होते.