पिलीवकरांनी बंद पाळला परंतू बंद संदर्भात राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मिडीयावर खडाजंगी…!

पिलीव/सुजित सातपुते
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकरी बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कुमारसिंग भैस,लहु पाटील व कुमार लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील पिलीव गाव बंद ठेवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

तर हा बंद पुकारल्याने अतोनात नुकसान होत असल्याने भाजपाच्यावतीने युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल मदने हा बंद बेकायदेशीर आहे म्हणून बंदला विरोध करुन व्यापार्यांचे समर्थन केले.आदल्यादिवशी एकिकडे राष्ट्रवादीच्यावतीने बंद पुकारण्याचे आवाहन करण्यात आले होते.

तर दुसरीकडे भाजपाच्यावतीने सोशल मिडीयावरती बंदला कडकडीत विरोध करण्यात येत होता.या कारणावरुनच दोन्हीं पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी पहावयास मिळाली होती.परंतु आज पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने बंदला कुठेही गालबोट लागले नाही.बंद बाबतचे निवेदन देते वेळी राष्ट्रवादीचे पिलीव शहराध्यक्ष कुमारसिंग भैस यांनी सांगितले की मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी बांधव तसेच सर्वसामान्य गोरगरीब दलित,अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने अन्याय-अत्याचार करत आहे.आपल्या न्याय हक्कांसाठी लोकशाही मार्गाने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर सत्तेचा दुरुपयोग करून मोदी सरकार दाबाव टाकत आहे.तसेच ईडी-सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना संपविण्याचे कारस्थान भाजप सरकार करत आहे.
त्यामुळे मोदी सरकारचा आम्हीं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे भैस यांनी सांगितले.या प्रसंगी लखीमपूर या ठिकाणी आंदोलना दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली वाहून पिलीव औट पोस्टचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांना निषेध नोंदविल्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी माजी सरपंच अमोल मदने,संग्राम पाटील,अशोक बगाडे,महावीर धायगुडे,ग्रा.पं सदस्य राजेंद्रसिंग जामदार,नितीन कपने,उमेश सरवदे,संतोष पडळकर,राजू मदने,शिवराज पुकळे,सुरज करांडे,अक्षय वगरे,वैभव पिसे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *