डॉ.संतोष माने-देशमुख व डॉ.विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बचेरी ग्रामपंचायत तर्फे ठेवण्यात आलेल्या लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : ग्रा.पं सदस्य विश्वजीत गोरड यांचा पुढाकार..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील बचेरी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने आज लसीकरण शिबीर संपन्न झाले.यावेळी सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती.अखेर सायंकाळी सहा वाजेपर्यंत गर्दीचा ओघ सुरूच असल्याचे पहावयास मिळाले.

अगदी शांततेत लोकांनी लस घेऊन ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य केले दिवसाखेर तीनशे लोकांनी लस घेऊन उत्तम प्रकारे हजेरी लावली.वेळोवेळी सर्व्हर डाऊन होत आसल्याने थोडा वेळ लागत होता त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चेहर्यावर थोडासा ताण जाणवत होता.तरीही त्यांनी आपले कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले.बचेरी गावचे कर्तव्यदक्ष सरपंच महादेव पाटील सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडून बसले होते व प्रत्येकाच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवताना दिसत होते.ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत गोरड,जयवंतराव भिसे, महादेव बरकडे हे सुद्धा आपापल्या वार्डातील लोकांना लसीसाठी प्रत्यक्ष भेटून व फोन वर संपर्क साधत होते.वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास जाधव यांनी लसीकरण केंद्रास भेट देऊन मार्गदर्शन केले.यावेळी आरोग्य सेविका ललिता राठोड व गट प्रवर्तक शाहीन शेख यांना नायमाचा भंग न करता रितसर व शासकीय नियमानूसार बचेरीकरांना शिस्तीत लस दिली.यावेळीशिक्षक कर्मचारी जाडे सर, काटे सर व आशा सेविका ऐवळे,गुजरे, गाढवे,धांडोरे,भिसे,मुंजे आरोग्य सेवक करपे हे उपस्थित होते सर्वानी आपापली जबाबदारी चोख व प्रमाणिक पणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *