सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांना पितृशोक

पिलीव / रघुनाथ देवकर
माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागाचे ज्येष्ठ नेते , व सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक व इतर कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी धावून जाणारे , तसेच लहान थोरांपासून ते युवकांपर्यंत आणि शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांमध्येच “नाना” या नावाने लोकप्रिय असणारे , आज एकविसाव्या शतकातही ६०-६५ जणांच्या कुटुंबाचे प्रमुख पद आदर्श पद्धतीने पार पाडणारे सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे वडील नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांचे वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सातारा,सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी,स्नेही व आप्तेष्ठांनी त्यांच्या निधनाबद्दल दूरध्वनीवरून शोक व्यक्त केला. त्यांच्या पार्थिवावर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन अतीव दुःखाने अंत्यसंस्कार करुन त्यांचे पुत्र बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी भडाग्नी दिला.नानांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद, गोरडवाडीचे सरपंचपद, माळशिरस तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्षपद अशी अनेक पदे समर्थपणे भूषवली.त्यांच्या जाण्याने माळशिरस तालुक्यामध्ये सामाजिक,राजकीय व सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा तिसरा (रक्षाविसर्जनाचा) कार्यक्रम गुरुवार दि. १०/६/२०२१ रोजी होणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *