डॉ.सुरेश सातपुते यांची जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड.. !
पिलीव/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सोलापूर जिल्हयाच्या जिल्हा सरचिटणीस पदी सोमनाथ तोरणे यांची कार्यकारणी सदस्य पदी कुसमोड येथील डॉ. सुरेश सातपुते यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हयाचे नेते उत्तमराव जानकर यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष प्रा.धनंजय साठे यांच्या उपस्थिती मध्ये वेळापूर येथे निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी कुसमोड ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य महावीर आप्पा धायगुडे,तुषार लवटे,केशव शिंदे,जिल्हा चिटणीस डॉ. विश्वास वाघमारे आदीसह सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.