अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकाम निधी संकलन अभियानास पिलीव येथे श्रीराम मंदिरातून प्रारंभ

पिलीव प्रतिनिधी : अयोध्या येथे सुरू असलेल्या श्रीराम मंदिराच्या कामासाठी आपलाही खारीचा वाटा असलाच पाहिजे या अपेक्षेने पिलीव येथील असंख्य श्रीराम भक्तांनी पिलीव येथील श्रीराम मंदिरात उपस्थित राहून श्री गणेश व श्री प्रभू रामचंद्रांची आरती करुन “श्रीराम जय राम जय जय राम” व “श्री प्रभू रामचंद्र भगवान की जय” या जयघोषामध्ये श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानास प्रारंभ केला. अभियानाचे प्रारंभी मंडल प्रमुख अतुल आर्वे, ॲड तेजसिंह जहागिरदार यांनी अभियानाची माहिती दिली. सदरचे अभियान घरोघरी जाऊन नंतर ह.भ.प. हरिहरनंदन बाबा उर्फ रवींद्र महाराज करमाळकर यांचे हरिहरभक्तीपीठामध्ये पोहोचले. सदर ठिकाणी चैतन्यकुमार देवकर,स्वप्निल कुलकर्णी,बंडू देवकर,चेतन कोळी यांनी अभियानाची माहिती देऊन ह.भ.प. हरीहरनंदन बाबांची देणगी (निधी) संकलित केली. अभियानाचे सुरुवातीलाच असंख्य श्रीराम भक्तांनी उत्साहाने उपस्थिती दाखवली. अभियानात भक्तांचा प्रतिसाद वाढत असून हे अभियान ३१ जानेवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती शिवप्रसाद पुकळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *