शिंगोर्णी येथील दहा वर्षाची सत्ता तरुण कार्यकर्त्यांनी टाकली उलथून..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी येथील ग्रामंचायतीत १० वर्षाने सत्तापरिवर्तन झाले असून सर्व विजयी उमेदवारांचा सन्मान राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी वेळापूर येथील गरुड बंगला येथे करून भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.शिंगोर्णी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाला फक्त तीन जागा मिळाल्या असुन जनसेवा महविकास आघाडी ला 8 जागा मिळाल्या आहेत.वार्ड 1 मधून, कोंडीबा (भाऊ) हनुमंत गोडसे, सौ. जया दादा बोडरे, वार्ड 3 मधून सौ. माया औदुंबर काळेल, रघुनाथ संदीपान गोडसे, बाळाबाई आबा शिंदे, वार्ड 4 मधुन शरद दादा गायकवाड,अक्षय अनिल धांडोरे, सौ.संगीता नाना मुंजे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. जनसेवा महविकास आघाडी च्या विजयासाठी माजी सरपंच सागर धांडोरे,माणिक मुंजे,डॉ.समीर साठे,पोपट करांडे,पोपट कदम,विनायक गाडे,औदुंबर काळेल,आप्पा कदम,आंदू बोडरे,विकास मोरे,विवेक मोरे,मच्छिंद्र ऐवळे,सोमनाथ काळेल,तानाजी हजारे, शंकर धांडोरे आदिंनी परिश्रम घेतले.