९८ वर्षाच्या पणजोबा-पणजीच्या साक्षीने ९ वर्षाच्या बालिकेने चुलत्याला दिला वृक्षारोपणाचा संदेश.. !

पिलीव/प्रतिनिधी पिलीव येथील चैतन्यकुमार रघुनाथ देवकर फर्ग्युसन कॉलेज पुणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवकर परिवारातर्फे घरगुती स्वरूपात साध्या पद्धतीने सुवासिनींकडून औक्षण करीत वाढदिवस चालू असतानाच नऊ वर्षाची बालिका स्वरांजली हिने शाळेत मिळालेले वृक्षाचे रोपटे घेऊन प्रवेश केला व आपल्या ९८ वर्षांच्या पणजोबा -पणजी, आजोबा -आजी आणि आत्यांसमक्ष आपल्या बोबड्या भाषेत २१ व्या शतकातील आपल्या चुलत्याला वयाच्या २१ व्या वर्षात पदार्पण करताना भेट म्हणून वृक्षाचे रोपटे देत ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात लावण्याचा संदेश देऊन मी २१ वर्षांची होईल, त्यावेळी मला त्या वृक्षाच्या सावलीत ज्ञान घेण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून आगळावेगळा वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *