निमा संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.जी एस कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त पंढरपूर ,अकलुज व माढा शाखेच्यावतीने सन्मान…!

पिलीव/प्रतिनिधी
डॉक्टरांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्याचे काम करीत असलेली भारत देशातील सर्वात मोठी व सर्वात जुनी संघटना म्हणजे निमा संघटना असून याच निमा संघटनेने रविवार दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी औरंगाबाद येथे राज्य कार्यकरणीच्या बैठकीचे आयोजन केले होते.सदर बैठकीत डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी काय भूमिका घ्यायची ? व्यवसायाच्या व डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी काय करता येईल ? या व अशा विविध स्वरुपांच्या प्रशानांवर चर्चा करण्यात आली.यावेळी निमा संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.जी एस.कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त निमा संघटना पंढरपुर,आकलुज,माढा यांच्यावतीने डॉ.जी एस.कुलकर्णी यांना पिलीव येथील डॉ.मिलिंद गुळभीले,डॉ.सुरेश व्यवहारे व डॉ.सोमनाथ शिंदे यांनी फेटा,शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून यथोचित सन्मान करुन दिर्घायुष्यासाठी खूप सार्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *