पिलीव कडकडीत बंद : सोशल मिडीयातून भाजपा समर्थकांचा बंदला विरोध मात्र हा बंद योग्यच असल्याचा विरोधकांचा दावा..!

पिलीव/प्रतिनिधी
कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला माळशिरस तालुक्यातील पिलीव गावामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली आहेत.

रस्त्यावर सध्या शुकशुकाट असून पिलीववासीयांनी शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केला आहे.काल सोमवार दिनांक 7 डिसेंबर रोजी या बंदला पाठिंबा देण्याच्या संदर्भात पिलीव येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उमेश(आण्णा)देशमुख यांनी गावातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.त्या आवाहनाला व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिल्याचे आज दिसून आले.याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी देखील या बंदला पाठिंबा दिला आहे. राजकीय पक्षांचा सहभाग असला तरी हा राजकीय बंद नाही.कुठल्याही राजकीय पक्षाच्या वा संघटनेच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा बंद नाही.पिलीव येथील बहुतांश सोशल मीडियामध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या समर्थकांनी सोशल मीडियात या बंदला विरोध व्यक्त केला.

तर त्यांच्या विरोधी गटातील काहीजण मात्र हा बंद योग्यच असल्याचे सांगत आहेत.यावरून सोशल मीडियातून वाद-विवाद पाहावयास मिळाले असले तरी बंद मात्र 100% पाळण्यात आला.यावेळी सपोनि शशिकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *