सावित्रीबाई फुले यांनीच खरे शिक्षणाचे दरवाजे खुले केलेत – डॉ.श्यामसुंदर मिरजकर

पिलीव/प्रतिनिधी
महात्मा फुले यांच्या चळवळीचा खरा फायदा प्रथम कोणास झाला ?फुल्यांनी नाभिंकांचा संप घडवून आणला.विधवा ब्राह्मण स्त्रियांना मुंडन करून विद्रूप केले जात होते हे बंद झाले .बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी तयार करून त्यांनी अनेक ब्राह्मण विधवांना बाळंत व्हायची व्यवस्था केली.आज कोणत्या मुली १०० टक्के शिकतात ? आजही ब्राह्मण मुलींचे १०० टक्के शिक्षणाचे प्रमाण आहे जोतीराव ,फुले यांनी सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांना शिकवून तयार केले.त्यांनी मुलींची शाळा सुरु केली.ब्राह्मणी व्यवस्थेच्या चुकीच्या गोष्टी फुले यांनी दुरुस्त केल्या. लोक विद्येची देवता सरस्वती मानतात.कोणाची तशी श्रद्धा असेलही पण सावित्रीबाई फुले यांनीच खरे शिक्षणाचे दरवाजे खुले केले आहेत त्यामुळे आज निर्धोकपणे सर्व स्त्रिया शिक्षण घेत आहेत.पहिले वंदन त्यांनी सावित्रीबाई यांना केले पाहिजे असे परखड मत कला व वाणिज्य महाविद्यालय मायणी येथील प्रा.डॉ.श्यामसुंदर मिरजकर यांनी व्यक्त केले. ते येथील लुंबिनी संघ सातारा व समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्था मळोली ता.माळशिरस .जि.सोलापूर यांनी बहुजन प्रबोधन वर्षानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘’महात्मा जोतीराव फुले जीवन आणि कार्य या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध येथील मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.डॉ.हनमंत पोळ हे उपस्थित होते.डॉ.गोरख बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती .
फुलेंचे विविध क्षेत्रातील कार्य सांगताना ते पुढे म्हणाले की केवळ मुले शिकून उपयोग नाही त्यांचे आई बाप देखील शिक्षित असावेत म्हणून फुले यांनी प्रौढ शिक्षण रात्रशाळा निर्माण केली होती.फुले यांची मुलींच्या शाळेची परीक्षा पहायला ग्राउंडवर ३००० लोक उपस्थित होते.मुक्ता साळवे म्हणाली की मला खाऊ नको पण ग्रंथालय पाहिजे.तानुबाई बिर्जे ही पहिली पत्रकार फुल्यांच्या शाळेतील विद्यार्थिनी होती .जोतीराव आणि सावित्रीबाई यांना फुल्यांच्या वडिलांनी घर सोडायला लावले पण त्यांनी शिक्षणाचे काम सोडले नाही .फुलेंनी व्यवस्थेला तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ प्रश्न विचारले आहेत .त्यांनी चिकित्सेच्या अंगाने शिक्षण पुढे नेले,हेच मूल्याधिष्ठित शिक्षण होते .प्रागतिक व आधुनिक विचार त्यांनी मांडला आहे .त्यांनी झीरप सिद्धांत नाकारला .सक्तीचे शिक्षण सर्वाना द्यावे हीच त्यांची इच्छा होती .’’ज्याचा माल /त्याचे हाल /पडल्या पठाणांच्या पंक्ती /मुले ती भलत्याची शिकती /माळी कुणबी पट्टीची भरती ‘’ही विषमता त्यांनी अखंड मध्ये स्पष्ट केली .महा अरिच्या पोराचा विटाळ मानती /आपल्या मुला ते बोध देती /परकी मुले चुकता चापट्या मारिती /कान पिळती /मुका मार देती /हे लिहून त्यावेळचे शिक्षक मुलामुलात भेदभाव कसा करत होते हे त्यांनी सांगितले. शाळेत फक्त मुलांची नावे असतात पण मुलांना त्रास देऊन घरी पाठवले जाते असे शिक्षक काय कामाचे?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.त्यांनी लिहिलेल्या गुलामगिरी ,ब्राह्मणाचे कसब ,किंवा अन्य ग्रंथात शेटजी आणि भटजी हे शोषण कसे करतात यांचे दाखले दिले आहेत.त्यांनी आपल्या मृत्युपत्रात यशवंत याने समाजकार्य केले तर त्यास काय द्या हे लिहून ठेवले .सत्यशोधक समाज हा त्यांनी स्थापन केला.त्याचे ब्रीद वाक्य ‘’सर्वसाक्षी जगत्पती |तेथे नको मध्यस्थी हे आहे यावरून शोषण करणारे मधले दलाल नकोत ही भूमिका त्यांची दिसते असे ते म्हणाले.ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी |धरावे पोटाशी ,बंधू परि’’ हा उदात्त विचार त्यांनी मांडला.खल्लड ग्रंथाची चिकित्सा झाली पाहिजे.कारण गुलामगिरीचे ते मूळ आहे असे त्यांचे मत होते. बहुजन हिताय व बहुजन सुखाय साठी विचाराचा जागर नित्यपणे करावा असे आवाहन त्यांनी केले.समाजसुधारक महात्मे यांना जातीपुरते बंदिस्त करू नये,भारताच्या भवितव्यासाठी आणि उत्थानासाठी फुले यांचे कार्य आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.महात्मा फुले यांचे कार्य फार तर हडपसर ते भांबुर्डी पर्यत असेल,असे म्हणणारे चिपळूणकर आज मागे पडले पण फुले यांचे साहित्य सर्व भारतीय भाषात गेले.उत्तर भारतात जोतीराव फुले यांचे पुतळे तुम्हाला दिसतात,यावरून फुले यांचे विचार लोकांच्या मनात पसरले आहेत,आपले लोक कर्मकांडात अडकले आहेत .बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही छोट्या वर्गाची चळवळ नाही.महात्मा फुले यांनी तौलनिक विचार केला त्यामुळे सत्य शोधन चालू झाले असेही डॉ. मिरजकर म्हणाले .चार्वाक ,गौतम बुद्ध ,बुद्धाच्या संघातील विचारवंत ,नाथ संप्रदाय ,महाराष्ट्रातले संत ,यांचा विचारांचा आढावा घेत त्यांनी मांडणी केली भारताचा सामाजिक इतिहास हा फुले यांच्याशिवाय अपुरा आहे असेही ते म्हणाले .
अध्यक्षीय भाषणात डॉ.हनमंत पोळ म्हणाले की विचार पेरण्याचे काम या व्याख्यानमालेने सुरु केले आहे त्यामुळे अनेक विचारवंत तयार होतील.माणुसकी हाच धर्म आहे तीच फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा आहे असेही ते म्हणाले.
प्रारंभी समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्था मळोलीचे अध्यक्ष डॉ.सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन डॉ.धनराज आवळे यांनी केले.तर आभार तुकाराम लोखंडे यांनी मानले .या कार्यक्रमास डॉ.शिवाजी पाटील,डॉ.शरद गायकवाड, डॉ.शुभांगी शिंदे पुणे,वैशाली बनसोडे ,कल्याणी बनसोडे ,सम्यक खवळे,डॉ.अनिल जगताप ,रामचंद्र गायकवाड ,डॉ.प्रकाश कांबळे ,निशा मोरे –मोहिते,प्रा.दिलीप संघापवाद,दिपाली कराडकर ,रविंद्र इंगोले,एम.टी.सामंत ,महानंदा डाळिंबे ,महेंद्र माने ,डॉ.संजयकुमार सरगडे ,अजय दणाणे ,अक्षय खरात ,अनिल वीर ,अरुणा मस्के,बाबासाहेब वाघमारे ,प्रफुल्ल सरगडे ,राहुल लोंढे ,वैशाली खंदारे ,अजय दणाणे.बाळकृष्ण माने ,भास्कर टोणपे,केशव मोरे ,प्रा .प्रफुल्ल सरगडे ,अंकुश शेलार ,राहुल लोंढे ,नवनाथ लोंढे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *