सा.माळशिरस टाईम्सच्या दिवाळी अंकाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या शुभ हस्ते प्रकाशन…!

पिलीव/प्रफुल्ल वाघमारे
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील मुख्य संपादक सुजित दिगंबर सातपुते यांच्या साप्ताहिक माळशिरस टाईम्स (रजि.नं MAHMAR/2019/49596TC) या दिवाळी अंकाचे काल शनिवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या शुभ हस्ते अकलुज येथे प्रकाशन करण्यात आले.

शैक्षणिक,सामाजिक राजकीय,क्राईम व क्रीडा क्षेत्रातील अचूक व बेधडकपणे बातम्या देणे,शासनाच्या विविध शासकीय योजना गोरगरीब व गरजूंपर्यंत पोहोचवणे,वंचित,शोषित,पीडित व अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देणे व निपक्षपणे पत्रकारिता करणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून साप्ताहिक माळशिरस टाईम्स आजपर्यंत प्रकाशित झाला आहे व होत राहील असे सुजित सातपुते यांनी प्रकाशनाच्या वेळी सांगितले.त्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या साप्ताहिक माळशिरस टाईम्सचे लवकरात लवकर दैनिकांमध्ये रूपांतर व्हावे असा माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील वाचकांमधून आग्रह होत असल्याचे सातपुते यांनी सांगितले.यावेळी पिलीवचे जेष्ठ पत्रकार तथा पिलीव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दामोदर लोखंडे,पं.स सदस्य अजय सकट,प्रा.संजय पाटील,माळीनगरचे कार्यकारी संपादक उल्लास चंदनशिवे,अभिजीत तावरे,अजित करडे,गणेश देशमुख यांसह आदि मान्यवर उपस्थित होते.