पिलीव येथील कर्मवीर विद्यालयतील कु.शर्वरी विजय बंगाळे हिचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक परीक्षेत दैदिप्यमान यश..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयामध्ये शिकत असणारी कु.शर्वरी विजय बांगाळे हिने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक परिक्षेत तब्बल 90.97% गुण मिळवून राज्यस्तरीय मागासवर्गीय यादीत दहावा सोलापूर जिल्ह्यात दहावा तर माळशिरस तालुक्यात तिसरा क्रमांक पटकविला असल्याने कु.शर्वरी व तिच्या मार्गदर्शक शिक्षकांवरती शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे पहावयास मिळत आहे.शर्वरीच्या या यशाबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे विभाग प्रमुख कुलकर्णी मॅडम व हिरके मॅडम,विषय शिक्षक वाघमारे सर,जाधव सर,ऐवळे सर,जरे मॅडम,लिंगे मॅडम,आठरे मॅडम,आळंदे मॅडम,माने सर,स्थानिक स्कूल कमिटी,शाळा व्यवस्थापन समिती,पिलीव पत्रकार संघ,मुख्याध्यापक श्री लेंडवे सर,पर्यवेक्षक गायकवाड सर,तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा दिल्या…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *