करोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी..!


सोलापूर / प्रतिनिधी

जगाच्या पाठीवर करोना या महामारी ने धुमाकूळ घातला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या भल्या साठी आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी
महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असलेतरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला घरी राहण्याबाबत जनजागृती करत आहेत तसेच राज्य सरकार व जनता यांच्यात दुवा म्हूणन भूमिका बजावत आहेत करोना हा रोग जीवघेणा आहे माहित असून देखील जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रस्त्यावर फिरून आपली भूमिका बजावत आहेत
केंद्र सरकार व राज्य सरकार ने डॉक्टर व वैद्यकिय क्षेत्रातील तसेच जनते साठी वेगवेगळ्या आर्थिक तरतुदी केल्या आहेत परंतु पत्रकारांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केली नाही
आज राज्यातील पत्रकारांची अवस्था अत्यंत बिकट व सुमार असून त्यात अल्प मानधनावर काम कामकारणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकारांची संख्या खूप मोठी आहे तरीही समाज आणि देशहितासाठी पत्रकार खूप परिश्रम घेत आहेत कुठलेही आर्थिक पाठबळ नसल्याने पत्रकारांवर उपासमारी ची वेळ आली असून वैद्यकिय उपचार करण्यासाठी देखील पैशाची अडचण आहे केंद्र सरकार व राज्य सरकार ने करोना च्या संकट समयी सर्व सामान्य जनतेला मोठया प्रमाणात आर्थिक सवलती जाहीर केल्या असून त्यात पत्रकारांचा अजिबात उल्लेख नाही
तरी मुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत जातीने लक्ष घालून राज्यातील पत्रकारांसाठी करोना च्या पार्श्वभूमीवर विशेष आर्थिक तरतूद करावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *