फोंडशिरस येथील माजी सरपंच दादा रणदिवे सह ग्रामसेवक धाईंजे व क्लार्क बोडरे यांच्यावर अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गावचे तात्कालीन सरपंच दादा महादेव रणदिवे (वय – 34),तात्कालीन ग्रामसेवक अशोक मुकुंद धाईंजे (वय 56) रा.जाधव वाडी,क्लार्क विजय खाशाबा बोडरे (वय 39) रा.फोंडशिरस यांनी 13 व्या वित्त आयोगातील ग्रामनिधी व पाणीपुरवठा खात्यातून 4 लाख 84 हजार 596 रुपये रक्कमेचा अपहार केल्याबद्दलची सोलापूर ॲन्टी करप्शन ब्यूरोकडे तक्रार प्राप्त झाली होती.सदर तक्रारीवरून करण्यात आलेल्या उघड चौकशीमध्ये वरील तिन्ही आरोपींनी आपल्या लोकसेवक पदाचा तसेच त्यांना असलेल्या अधिकारांचा दुरुपयोग व गैरवापर करून दिनांक4/4/2015 ते दिनांक 10/12/15 या कालावधीत संगनमताने 13 व्या वित्त आयोगातील फोंडशिरस ग्रामपंचायतील ग्रामनिधीची रक्कम 4 लाख 73 हजार 496 व पाणी पुरवठा खात्यातून 11 हजार 100 रुपये अशी एकूण 4 लाख 84 हजार 596 रुपये एवढी रक्कम सरपंच रणदिवे व ग्रामसेवक धाईंजे यांनी स्वतःच्या अधिकारातून क्लार्क बोडरे यांचे नावे चेकद्वारे काढून सदरची रक्कम तिघांनी स्वतःकरता बेकायदेशीरपणे मिळवून शासकीय रक्कमेचा अपहार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.सदर रक्कम मिळवण्यासाठी सरपंच दादा रणदिवे,ग्रामसेवक अशोक धाईंजे व क्लार्क विजय बोडरे यांनी संगनमताने ग्रामपंचायत फोंडशिरस करिता आवश्यक असणाऱ्या संबंधित वस्तू खरेदी न करता तसेच संबंधित केलेल्या कामाच्या बनावट पावत्या तयार केल्या त्या बनावट पावत्या खऱ्या म्हणून वापरून सदर पावती वरून व्हाउचर बिल तयार केले.व या बाबत खोट्या नोंदी ग्रामपंचायतच्या कॅशबुक रजिस्टरमध्ये घेतल्या आहेत.म्हणून तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 13(1)(क),13(2) तसेच भा.दं.वि 465,466,467,468,471,477(अ),34 या कलमांतर्गत गुन्हां दाखल झाला असून पुढील तपास ॲन्टी करप्शन पोलिस निरीक्षक कविता मुसळे करीत आहेत.