पिलीव येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान व वृक्षारोपन…!

पिलीव/सुजित सातपुते
आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन द्वारा आयोजित सोलापूर झोन 33 ब्रांच पिलीव च्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या स्वच्छता अभियानामध्ये पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी पिलीव गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दामोदर लोखंडे,पत्रकार प्रा.संजय पाटील व पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुजित सातपुते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सदरचा कार्यक्रम पार पडण्यासाठी पोपटराव टकले(मुखी पिलीव ब्रँच),अनिल देशमुख,संजय कदम,सिद्धेश्वर लेंगरे,बापू तरंगे,विजया देशमुख (नारी साथ संगत मुखी),लता टकले,निर्मला खरात,विजया कदम यांसह अनेक निरंकारी मंडळातील बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले व विशेष कार्यक्रम म्हणून आज सायंकाळी 7:00 वाजता पिलीव येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये सत्संग व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सदर कार्यक्रमाचा पिलीव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे संयोजक अनिल देशमुख यांनी माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *