पिलीव येथील खडीचा महादेव येथे महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील खडीचा महादेव मंदिर येथे काल शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2020 रोजी महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करून दिवसभर भजन,किर्तनाचा कार्यक्रम व रात्री 12:00 वाजता लिंग पूजन करून बेल वाहण्याचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात अगदी उत्साहात संपन्न झाला.व आज शनिवारी सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.खडीचा महादेव मंदिर एक जागृत देवस्थान समजले जाते.या ठिकाणी श्रावण महिना,चैत्र महिना,महाशिवरात्र असे वर्षातून चार-पाच वेळा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.परंतु हा महाप्रसाद करण्यासाठी शिवभक्तांना पातेल्याची कमतरता भासत होती.

वेळोवेळी ही पातेली भाड्याने आणावी लागत होती.त्यामुळे बाळासाहेब काळे यांनी महाशिवरात्रीनिमित्त 76 किलो वजनाची ॲल्युमिनियमची दोन पातेली महादेव मंदिरास अर्पण केली आहेत.त्याबद्दल त्यांचा महादेव मंदिरामध्ये सत्कार करण्यात आला.यावेळी सदरचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी शिवभक्त ब्रह्मदेव मल्हारी लोखंडे,ग्रा.पं सदस्य गणेश लोखंडे,आप्पासाहेब लोखंडे,लालासाहेब लोखंडे,सागर लोखंडे,कुमार लोखंडे,दिलीप लोखंडे,धनाजी लोखंडे,अशोक महाराज,रावसाहेब लोखंडे,विष्णू लोखंडे(बुवा),मल्हारी लोखंडे,दादा सातपुते यांनी परिश्रम घेतले.
