अपंगाचा निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा – आजिनाथ राऊत



निधी खर्च न केल्यास एन.डी.एम.जे. संघटणेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत करणार पंचायत समिती परांडा समोर तिव्र आंदोलन…!
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

पंचायत समिती कार्यालय परांडा अंतर्गत 72 ग्रामपंचायती असुन सर्व ग्रामपंचायत असलेल्या गावात अपंग व्यक्ती आहेत.चौदावा वित्त आयोगातुन ग्रामपंचायतला मिळणाऱ्या निधितुन 5% निधी अपंगावर खर्च करने बंधनकारक आहे तरीसुध्दा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी अपंगावर निधी खर्च केलेला नाही,
तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांनी चौदावा वित्त आयोगातील तरतुदीत अपंगाना असलेला हक्काचा पाच टक्के निधी खर्च केला नाही,त्यांच्या अडी अडचणी जानुन घेऊन सोई सुविधा पुरवल्या नाहीत. ग्रामसेवक अधिकारी हे अपंगाच्या हक्काचा निधी खर्च करण्यास व त्यांना सोई सुविधा पुरवण्यास जानुन बुजुन टाळाटाळ करत आहेत, काही ग्रामसेवक अपंगावर निधी खर्च करने बंधनकारक आहे हे माहित असतानासुध्दा तो निधी इतरत्र वळवुन सदर निधीचा गैरवापर करत आहेत, सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची आहे.परांडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना चौदा वित्त आयोगातुन ग्रामपंचायतला आलेल्या निधितुन 5 टक्के निधी अपंगावर खर्च करून सर्व प्रकारच्या सोई सुविधा पुरवण्याचे आदेश द्यावेत तसेच अपंगावर निधी खर्च करण्यास टाळाटाळ करून कर्तव्यात कसुर करनाऱ्या ग्रामसेवकांवर प्रशासकीय कार्यवाही करून गुन्हे दाखल करावेत अन्यथा दिनांक 10/03/2020 रोजी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालय परांडा समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटणेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी लेखी निवेदनाव्दारे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रावसाहेब चकोर यांना दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *