मा.श्री.सागर सरगर (सर) यांनी अल्पावधीतच संस्था नावा रुपाला आणली – स्वरुपाराणी मोहिते-पाटील

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील श्रीमती किसाबाई शंकर सरगर बहुउद्देशीय संस्था संचलित कै.अमोल पिसे इंग्लिश मिडियम स्कूल पिलीवचे वार्षिक स्नेहसंमेलन विविधउपक्रमानी उत्साहाने रंगबहार कार्यक्रम सादर करून साजरे करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या व सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील होत्या.प्रारंभी विद्येची देवता सरस्वती,कै.अमोल पिसे व श्रध्दास्थान साईबाबबांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्वरूपाराणी मोहिते पाटील माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार जि.प सदस्य गणेश पाटील,सभापती सौ.शोभाताई साठे,सरपंच नितीन मोहिते,उपसरपंच सौ.शमशाद काझी,सौ.शशिकला लोखंडे,सचिन पाटील,पोलिस पाटील विकास सरगर,शिवाजीराव सरगर,रामचंद्र माळी,डॉ.उत्तमराव सरगर,संस्थापक/अध्यक्ष सागर सरगरसर,प्राचार्य सौ.अंजली उपाध्ये,संतोष वलगे,महादेव झोळ,संजय मोहिते,सचिन पवार,संजय गवळी,दत्तात्रय पवार,बंडू कोळी,शिवाजी लाडे,डॉ.कुमार लोंढे,गणेश माने,विद्यार्थी,पालक बक्षीस विजेते स्पर्धक,तंटामुक्ती अध्यक्ष दामोदर लोखंडे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना स्वरूपाराणी मोहिते पाटील यानी पिलीव सारख्या ग्रामीण भागात 500 मुले इंग्रजी मिडियमचे शिक्षण घेतात व शहरापेक्षा त्यात अकलूज सारख्या शहरातही आशी भव्य इमारत सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही पण संस्थापक सागर सरगर सर यांनी हे केले असल्याचे गौरवोद्गार काढले व त्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शिक्षणात स्वातंत्र्य द्यावे त्यांच्यावर पालकांनी आपले विचार किंवा ईच्छा लादू नये आसा सल्लाही त्यांनी यावेळी दिला असून इंग्लिश मीडियम स्कूलने वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्ताने आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धेतील विजेत्याना गुणवंत विद्यार्थ्यांना विनाअपघात सेवा केलेल्या बसचालक ड्रायव्हर व शिक्षकांचा,सरगर सर व प्राचार्य सौ.अंजली उपाध्ये
व कर्मचारीवर्ग यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपूते यांनी ही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन संस्थेच्या कार्याविषयी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.त्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटला यावेळी देशभक्ती वर आधारित जीवंत देखावेगित मराठी लावण्या भक्तीगिते कोळीगिते पंजाबीडान्स फँशनशो आसा रंगबहार कार्यक्रम सादर करण्यात आला हा मनमोहक डिजिटल प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मंत्रमुग्धकरणार्या कार्यक्रमाला उत्सपूर्त पणे दाद देण्यात येत असल्याचे दिसत होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या सौ.अंजली उपाध्ये,रिजया सय्यद प्रास्ताविक सौ.संतोषी कर्णकोटे आभारप्रदर्शन प्रियंका लोंढे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *