सरकारी बांधकाम कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
जवळा नि:- सरकारी बांधकाम कामगार कार्यालय उस्मानाबाद मधील अधिकारी यांनी खाजगी आँफीस थाटुन एजंट ठेऊन कामगारांच्या नोंदणीसाठी शासनाकडुन तसेच वरीष्ठ कार्यालयाकडुन आलेली सर्व पासबुके,पावती बुके त्यांनी ठेवलेल्या खाजगी एजंटना देऊन बोगस कामगारांच्या बाहेरच नोंदी करत आहेत,आँफीसमधील महत्वाची असलेली सर्व रजिष्टर,आवक जावक दप्तर,कोरी पावती बुके,कोरी पासबुके खाजगी एजंटच्या आँफीसमध्ये ठेवली जातात,सरकारी आँफीसमध्ये नोंदणी करण्यासाठी आलेल्या कामगारांना आँफीसचे काम बंद आहे,पासबुक संपली आहेत,पावतीबुक संपली आहेत असे सांगुन अनेक हेलपाटे मारायला लावुन नाहक ञास दिला जातो,सरकारी आँफीसमधील सर्व कामे फक्त खाजगी एजंट मार्फत केली जातात,अनेक कामगारांनी स्वता आँफिसात येऊन योजनांचा आर्थिक लाभ मिळण्यासाठी कागदपञे जमा केलेली आहेत परंतु आर्थिक लाभ मिळणे तर दुरच परंतु मागणी केल्याचे फाँर्म व कागदपञे कचऱ्याच्या डब्यात धुळखात पडलेले दिसुन येतात.आणि खाजगी नेमलेल्या एजंटमार्फतची कामे माञ तात्काळ केली जातात,प्रत्येक योजनेचा लाभ घेयचा असेल तर एजंट व अधिकारी मिळुन कामगारांना मिळालेल्या रकमेतुन अर्धी रक्कम घेतात,म्हणुन खरे कामगार दुर ठेऊन बोगस नोंदी करुन खऱ्या लाभार्थींची दिशाभुल करुन शासनाची फसवणुक करण्याचे काम हे अधिकारी करत आहेत म्हणुन विनंती कि शासनाच्या निधीचा गैरवापर करुन बोगस नोंदण्या करणाऱ्या खाजगी एजंटची, कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची काटेकोरपणे चौकशी करुन,दोषी आढळुन येणाऱ्या अधिकारी,कर्मचारीऱ्यासह खाजगी एजंटवर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस (एन.डी.एम.जे.)संघटनेमार्फत जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचेकडे केली आहे