न्याय सहाय्यक विज्ञान संस्था मुंबई तर्फे दिघेवाडी येथे सार्वजनिक वाचनालयाची स्थापना

उस्मानाबाद/अजिनाथ राऊत
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
न्यायसहाय्यक विज्ञान संस्था मुंबईतर्फे दिनांक ४ ते १० जानेवारी २०२० पर्यंत आयोजित सात दिवसाच्या विशेष निवासी शिबिराचे आयोजन पँराडाईम फार्महाउस गोंडाले, तालुका सुधागड पाली, जिल्हा रायगड येथे करण्यात आले होते.

दिघेवाडी येथे दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी श्री.विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेचे संचालक मा. डॉ. जयराम खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक श्री. मिलिंद पंचभाई, श्री. मिलिंद मेश्राम व यसदा संस्थेचे प्रमुख शशिकांत खंडागळे आणि विशाल अडसुळे तसेच निस्सी चँरिटेबल ट्रस्टचे प्रमुख टायटस जाँर्ज हे उपस्थित होते. सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटनासाठी दिघेवाडीतील ग्रामस्थ श्री.दिलीप दिघे, श्री. जयेंद्र दिघे श्री.भनगे आणि सर्व ग्रामस्थ मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्राध्यापक डॉ. केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांनी दिघेवाडी येथे सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. गावातील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून शिक्षणाच्या दिशेने अतिशय महत्त्वाचे पाऊल टाकले. एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके गोळा केली होती. तसेच काही संस्थांनी योगदान देऊन पुस्तकात भर दिली यात मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे निस्सी चॅरिटेबल ट्रस्ट चे प्रमुख मा. टायटस जॉर्ज, यसदा संस्थेचे सचिव मा. शशिकांत खंडागळे आणि विशाल अडसुळे तसेच सायबर डिपार्टमेंटच्या प्रमुख निता खोब्रागडे मॅडम. वाचनालया करिता विद्यार्थ्यांनी एकूण ४०१ पुस्तके गोळा केली होती. त्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी भाषेतील जनरल नॉलेज, इंग्लिश स्पीलिंग ग्रंथ गोष्टींची पुस्तके, आत्मकथा, गणित, विज्ञान, इतिहास तसेच अनेक प्रकारची पुस्तके होती.

डॉ केवल उके यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले आणि वाचनालयाचा योग्य वापर कसा करावा यावर मोलाचे मार्गदर्शन दिले. मा. डॉ.जयराम खोब्रागड यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणाची जाणीव निर्माण केली. श्री.विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना अतिशय सुखरुपरित्या पार पडली.

न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सिकलसेल एनिमिया या रोगावर प्रबोधनाचा आणखी एक महत्वाचा कार्यक्रम आदिवासी आश्रम शाळा वावळोली येथे राबविला.
सिकलसेल एनिमिया या विषयावर माहिती देण्यासाठी न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेचे प्राध्यापक मिलिंद पंचभाई यांना शाळेने आमंत्रित केले होते. मिलिंद पंचभाई सरांनी अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने सिकलसेल एनीमिया ची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. यावेळी कोलाबा जिल्हा शिक्षण संस्थे चे अध्यक्ष मा. राजेंद्र लिमये, न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे, आदिवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सावंत मैडम व इतर शिक्षक उपस्थित होते.

या सात दिवसीय शिबिरात न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेतील ३० एन. एस. एस. स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी सहभाग घेतला. त्यांनी गावोगावी, शाळेत तसेच सार्वजनिक ठिकाणी काही उपक्रम राबविले आणि सार्वजनिक कार्यक्रम करून जनजागृती केली. प्रामुख्याने श्रम संस्कार आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला गेला. ग्रामीण स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, शिक्षण प्रचार आणि प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, विद्यार्थी विकास, अरोग्यसेवा व व्यसनमुक्ती पथनाट्य, सायबर सिक्युरिटी अवेयरनेस प्रोग्राम तसेच ग्रामीण आरोग्य सर्वे इत्यादी कार्यक्रम राबवून जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी नांदगाव येथे ३०० गोंन्यांचा बंधारा बांधला, आदिवासी आश्रमशाळा-वावळोली येथे किशोरवइन मुलिंचे आरोग्य यावर प्रबोधन करण्यात आले आणि प्राथमिक आरोग्य केंद्र- पाली येथे आरोग्य योजनांचा पथनट्याच्या माध्यमातून प्रचार प्रसार करण्यात आला.

हे सर्व कार्यक्रम यशस्वी बनविण्यासाठी महाविद्यालयाचे संचालक मा. डॉ. जयराम खोब्रागडे, प्रोफेसर डॉ. केवल उके आणि एन.एस.एस. लिडर आकांक्षा कुमारी, शंतनू गडदे व ओमराज पाटील यांचे मोलाचे योगदान ठरले. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून समाजसेवेत सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेच्या एन.एस.एस. स्वयंसेवक आणि स्वयंसेवकांनी मोलाची कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *