पंढरपूर तालुक्यातील दहशत संपुष्टात; दादया-पांड्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई


करकंब प्रतिनिधी – पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, तरटगाव, पिराची कुरोली, पंढरपूर, सांगोला, अकलूज या परिसरात दाद्या उर्फ दादासाहेब गोरख चव्हाण व त्याचा भाऊ पांड्या पांडूरंग गोरख चव्हाण यांनी गेल्या काहि वर्षापासून गुन्हेगारी टोळी तयार करुन सर्व सामान्य नागरिकांना तसेच शासकीय कर्मचारी यांचेवर हल्ले करुन टोळीतील 40 ते 50 साथीदारांच्या मदतीने दहशतीने दबदबा निर्माण करुन या टोळीने बेकायदेशिर जमिनी बळकावने, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहान करणे व दुसऱ्याच्या शेतीच्या वादामध्ये पडून मारहान करुन जबरदस्तीने गट शेतीचे वाट नांगरुन कब्जा करणेव वाळूची मोठया प्रमाणात तस्करी करणे हे या टोळीचे काम सन 2013 पासून ते आजतागायतपणे सतत या गुन्ह्याची मालिका केली आहे. या टोळीविरुध्द शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना धमकावने व सरकारी कामात अडथळा आणने पिस्तूल, तलवारी सारखे हत्यारे जवळ बाळगने वाळू चोरी (गौन खनिज तस्करी) मारामारी, अँट्रासिटी अशा प्रकारचे टोळीतील गुन्हेगारावर आजपर्यंत गंभीर 19 गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे या टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठ व आर्थिक फायदा मिळणेसाठी केलेले आहेत व करीत आहेत.
या गुन्हेगारी टोळीने बनावट दस्तावेज तयार करुन एका बँक अधिकाऱ्याकडून चाळिस लाख रुपयांची फसवणूक केल्यामुळे संबंधित बँक अधिकारी यांनी आत्महत्या केल्याने त्याचा बळी घेतला आहे. या टोळीला वेळीच वेसन घालण्याचे काम जिल्हा पोलीस अधिक्षकाने करुन त्या टोळीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असता. मा.विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांनी मान्यता दिली आहे. दाद्या – पांड्या चव्हाण यांना सदरचा मोक्का लागल्याने दाद्या चव्हाणाच्या साथीदाराचे धाबे दनानलले असून या मोक्क्यामध्ये दाद्या टोळीशी लागेबंदे असणारे सर्व क्षेत्रामधील समाजकंटकावर पोलीसांची टांगती तलवार आहे. दाद्या उर्फ दादा चव्हाण सध्या अटकेत असून पांड्या उर्फ पांडूरंग चव्हाण अद्याप फरार असून पोलीस सध्या शोध घेत आहेत. दाद्या उर्फ दादा चव्हाण या टोळीवर मोक्का लागल्याने पंढरपूर तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *