राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्य मा.सु.श्री. स्वराज विद्वानजी यांना दिल्ली येथे निवेदन…!मराठवाडा अध्यक्ष जगदीप दिपके यांच्यावर खोटी केस करणाऱ्या पोलीसांवर तात्काळ कारवाईची मागणी..!
नवी दिल्ली,
खान मार्केट येथे सु.श्री.स्वराजजी विद्वान यांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटणेचे राज्य सचिव वैभव गिते,मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनवणे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी भेटून निवेदन दिले
एन.डी.एम.जे.संघटणेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप दिपके यांना खोट्या केसमध्ये गुंतवणाऱ्या पोलिस निरीक्षक वैजीनाथ मुंढेंवर कारवाइ करण्याची मागणी करण्यात आली
याबाबत अधिक माहीती अशी की हिंगोली जिल्ह्यात जगदीप दिपके हे सामजिक कार्य करत असतांना पोलिसांना अनेकदा अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असतात.गोरगरीब जनतेला मदत म्हणून ते स्वतः पोलिस स्टेशनमध्ये व संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन जनतेच्या अडचणी सोडवतात याचा राग मनात धरून औंढा नागनाथ पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वैजनाथ मुंढे यांनी जगदिप दिपके सह मोहन दिपके यांचेवर पोक्सो कायद्या अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला व नंतर दुधाळा गावातील सुधिर गिरी यांना हाताशी धरून जगदिप दिपकेंचे घर जाळले व त्यांच्या आई-वडिलांवर हल्ला केला होता.
पोलीस निरीक्षक मुंढे यांचे दलित मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पोक्सो सारखे खोटे गुन्हे दाखल करने हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. याचा निषेध म्हणुन पो.नि.मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी एन.डी.एम.जे. संघटनेच्या राज्य राज्य सचिव वैभवजी गिते, राज्य महिला संघटक पंचशीला कुंभारकर व मुंबई-ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनवणे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या सु.श्री.स्वराजजी विद्वान यांना प्रत्यक्ष भेटुन लेखी निवेदन सादर केले. स्वराज विद्वान यांनी सदर पोलीस निरीक्षक मुंढे यांचेवर व वसंत लोभाजी दिपके यांचे घर जळणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच याप्रकरणी जानेवारी महिन्यात सुनावणी घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले
प्रमोद शिंदे
राज्य प्रसिद्धी प्रमुख
NDMJ