जो मैं बोलता हूँ ! ओ मैं करता हूँ ….!

सतीश लक्ष्मण भालके यांना मिळाली शासकीय नोकरी

मे 2015 मध्ये कंधार तालुका नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाजाचे संतोष लक्ष्मण भालके यांची निर्घृण हत्या झाली होती चार वर्षानंतरसुद्धा शासनाने त्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन केलेले नाही म्हणून
त्यांचे बंधू साईनाथ भालके राहणार गोणार ता.कंधार जि. नांदेड यांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव Dr. केवलजी उके व वैभवजी गिते यांच्याकडे कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची विनंती केली होती,dr. केवलजी उके यांनी ही जबाबदारी मा. वैभवजी गिते साहेबांवर सोपवली होती
चर्मकार समाजातील मयत संतोष लक्ष्मण भालके कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची सर्व जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे अशी घोषणा वैभवजी गिते साहेबांनी काही महिन्यांपूर्वीच केली होती
जिल्हाधिकारी नांदेड,आयुक्त समाजकल्याण पुणे,सामाजिक न्याय व विशेष सहायय विभाग मंत्रालय या विभागांकडे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेने कायदेशीर पाठपुरावा करून आझाद मैदान मुंबई येथे तीव्र निदर्शने करून शासनावर दबाव तयार केला यामुळे दिनांक 19 सप्टेंबर 2019 रोजी सहाययक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांनी शासकीय नोकरीत सामावून घेतल्याची आदेश काढले भालके कुटुंबांनी Dr.केवलजी उके साहेबांचे व वैभवजी गिते साहेबांचे आभार मानले
महाराष्ट्रातील खून झालेल्या 399 कुटुंबांचे पुनर्वसन केल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही असे वैभव गिते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
यापूर्वीच Dr. केवलजी उके व मा. रमाताई आहिरे यांच्या मार्गदर्शनात वैभवजी गिते यांनी नितीन आगे,माणिक उदागे,सागर शेजवळ,विशाल पगारे,संजय दनाने,या गाजलेल्या खून खटल्यांमध्ये त्यांच्या कुटुंबांना नोकरी,जमीन पेन्शन मिळवून देऊन पुनर्वसन केले आहे

अजिनाथ अंगद राऊत
उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)

जय भिम,जय रविदास,जय शिवराय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *