DYSP विशाल नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव पोलिसांकडून गणेश विसर्जन मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर : पहा आज २४ सप्टेंबर रोजी कोणते मंडळ कितव्या क्रमांकावर

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव गावामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या भव्य आयोजनामुळे पिलीवचा गणेशोत्सव माळशिरस तालुक्यात अव्वल मानला जातो. गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग, आकर्षक सजावट आणि मंडळांचा उत्साह यामुळे पिलीवच्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यंदाच्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या विसर्जन मिरवणुकांचे पिलीव पोलिसांकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.या वेळापत्रकानुसार विविध गणेश मंडळांच्या पिलीवच्या मुख्य पेठेतून एकूण ०७ मंडळांच्या मिरवणुका निघणार आहेत. त्या ०७ मंडळाची नावे व क्रम खालील प्रमाणे,

१. लंबोदर गणेश मंडळ(नवीन)
२. गजवक्र गणेश मंडळ
३. नरसिंह गणेश मंडळ
४. गजराज गणेश मंडळ
५. श्री दत्त गणेश मंडळ
६. संग्राम गणेश मंडळ
७. अष्टविनायक गणेश मंडळ
अशा पद्धतीने वरील क्रमानुसार एका एकापाठोपाठ एक अशी एकूण ०७ मंडळांची मिरवणूक निघेल,या सात मंडळाना अहिल्या चौक,मराठी शाळा,खलीपे चौक(राहुल खलीपे यांच्या घरासमोर),महाराणा चौक,नरसिंह चौक व आंधळकर चौक अशाप्रकारे प्रत्येक मंडळाला ०६ चौकात प्रत्येकी ४५ मिनिटे दिली असून पहिले लंबोदर गणेश मित्र मंडळ हे नवीन असल्यामुळे दुपारी १२:३० वाजता अहिल्या चौकात असेल तर ४:१५ ला आंधळकर चौकामध्ये असेल व सहा नंबरचे अष्टविनायक गणेश मित्र मंडळ सायंकाळी ५:३० वाजता अहिल्या चौकात असेल तर ९:१५ ला आंधळकर चौकात असेल व या दोन्हींच्या मध्ये उरलेली पाच मंडळे असतील,अशाप्रकारे आज व उद्या गणेश विसर्जनाच्या दिवशीही इतर गणेश मंडळांच्या मिरवणुका नियोजित वेळापत्रकानुसार मार्गक्रमण करणार आहेत. या सोहळ्यासाठी गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून,पिलीव गावातील गणेशोत्सवाची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात अनुभवायला मिळणार आहे.परंतु हे सर्व करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्व मंडळातील पदाधिकाऱ्यांनी, सभासदांनी व गणेश भक्तांनी काळजी घ्यावी, अन्यथा दोषी आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नवले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *