राजकीय वारसा नसतानाही महाराष्ट्र पिंजून काढणारा युवा चेहरा : सोलापूरच्या सुजित खुर्द यांची युवा सेनेच्या विस्तारासाठी जीवापाड धडपड !

पिलीव/सुजित सातपुते

कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जिद्द,निष्ठा आणि पक्षाप्रती असलेली अपार बांधिलकी यांच्या जोरावर युवा सेनेचा झेंडा घराघरात पोहोचविण्यासाठी झटणारे युवा सेना महाराष्ट्र राज्य (शिंदे गट) कोअर कमिटी सदस्य तथा माढा लोकसभा संपर्कप्रमुख श्री.सुजित दत्तात्रेय खुर्द हे नाव सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.

सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पाच प्रमुख जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत “गाव तिथे युवा सेना आणि घर तिथे युवा सेनेचा कार्यकर्ता” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुजित खुर्द हे दिवस-रात्र अविरतपणे काम करत आहेत.पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी अक्षरशः रक्ताचे पाणी केले असून अनेक गावांमध्ये नवीन कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना सुजित खुर्द म्हणाले, “मी कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेलो नाही. माझ्या पाठीशी कोणताही राजकीय वारसा नाही.मात्र माझे श्रद्धास्थान महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मार्गदर्शक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावरील नितांत श्रद्धा आणि विश्वासामुळे मी रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम करत आहे.पक्षासाठी झटणे हाच माझा धर्म असून सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे.”

राजकीय पार्श्वभूमी नसतानाही केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर संघटना वाढविण्याचे काम करणाऱ्या सुजित खुर्द यांच्या कार्याची विविध स्तरांतून दखल घेतली जात आहे.ग्रामीण भागातील युवकांना संघटित करून त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित करण्याचे मोठे काम त्यांनी हाती घेतले आहे.

युवा सेनेच्या विस्तारासाठी स्वतःच्या सुखसोयींचा त्याग करून राज्यभर दौरे करणारे सुजित खुर्द हे सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान बनत असून,निष्ठा आणि कर्तृत्वाच्या बळावर राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करता येते,हे त्यांनी कृतीतून दाखवून दिल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

# सुजित भैय्या यांच्या रूपाने आम्हाला एक स्वाभिमानी व निस्वार्थी नेतृत्व लाभले आहे,त्यांची सामाजिक कार्य करण्याची पद्धत बघून मीही स्वतःला युवा सेनेत स्वतःला झोकून दिले आहे,

#विजय कोकणे,अकलूज नेते,युवा सेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *