त्या लहानशा चिमुरड्यामध्ये अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनाची शपथ घेणारा भविष्यातील “वैभव गिते” दिसत होता..!
पिलीव/प्रतिनीधी
मुकनायक परिसंवाद कार्यक्रमातून काय सिध्द करायचे होते.तर हे सिध्द करायचे होते.वंचित,शोषित,पिडीत,अन्यायग्रस्त व गुलामगिरीत गुटमळून राहीलेल्या माझ्या बहूजन समाज बांधवांना संविधानिक न्याय मिळवून देण्यासाठी जसे तहानलेल्या तहाण,भूकेल्याल्या भूक मिटल्यावर समाधान वाटते.तसे आन्याग्रस्तांना न्याय मिळाल्यावर समाधान वाटते.अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी,जातियवाद्यांच्या गुलामगिरीतून बहूजन समाजाला मुक्ती मिळवून देण्यासाठी भविष्यकाळातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना कायद्याचे ज्ञान आत्मसात करुन देण्यासाठी,बहुजनांच्या आया-बहीनींची आब्रु लुटणार्यांच्या छताडावर नाचण्यासाठी कालचा अकलुज येथे झालेला मुकनायक परिसंवाद कार्यक्रम हा पोषक ठरला हे या पुस्तक वाचणार्या लहान चिमुरड्याकडे पाहून सिध्द होतेय.हा चामुरडा आहे खुडूस येथील पत्रकार सचिन करडे यांचा मुलगा सिध्दांत सचिन करडे (वय-7वर्ष) या मुलाच्या वडीलांनी मुकनायक परिसंवाद कार्यक्रमाला हजेरी लावली होती.यावेळी ते आपला मुलगा सिध्दांत यालाही घेवून आले होते.सदर कार्यक्रमाप्रसंगी सिध्दांत हा इतर मुलांप्रमाणे हॉलच्या बाहेर असणार्या आईस्क्रिम,कुल्फीच्या गाड्यावर न जाता हॉलच्या गेटवर उभा केलेल्या बार्टीच्या पुस्तक स्टॉलवर जावून “डॉ.बाबासाहेबांचे ओबीसी साठी योगदान” हे पुस्तक घेवून तिथेच वाचू लागला बघ्यांची एकच झुंबड उडाली अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला की इतका लहान मुलगा तो ही चक्क स्टॉलवर येतो आणि कोणालाही न विचारता स्वताच पुस्तक सिलेक्ट करतो आणि हातात घेवून खडा-खडा मोठ्याने वाचू लागतो.त्याच्याकडे बघून प्रत्येक माणसाला फिल होत होते कि हा चिमुरडा फक्त वयाने उंचीने लहान आहे.परंतु याचे विचार व झेप खूप उंच आणि मोठी आहे.त्याची वैचारिक क्षमता पाहून त्या लहानशा चिमुरड्यामध्ये सर्वांना भविष्यातील शोषित,पिडीत,वंचित आन्याग्रस्तांच्या पुनर्वसनाची शपथ घेणारा माळशिरस तालुक्यातील कुरबावी येथील वैभव गिते दिसत होता.सिध्दांतचा हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने सिध्दांत मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे.वैभव गिते यांनी सिध्दार्थच्या अंगी आंबेडकरी चळवळीचे सामर्थ्य आहे.तो भविष्यात एक आंबेडकरी चळवळीचा स्वाभिमानी व कट्टर कार्यकर्ता होईल असे माध्यमांशी बोलताना सांगितले व सिध्दांतच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारुन सचिन करडे यांचे गिते यांनी अभिनंदन केले.