पिलीव/प्रतिनिधी
अखंड महाराष्ट्रातील पत्रकारांचा आधार मा.श्री यशवंत शिवाजी पवार यांची राष्ट्रीय महास्वराजभुमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अतिरिक्त सचिव आणि महाराष्ट्राचे सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे , यशवंत पवार हे पत्रकार सुरक्षा समितीचे काम बघत असून महाराष्ट्रभर त्यांचा गाजावाजा आहे महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यातील हजारो पत्रकारांनी त्यांच्या सोबत संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रम आंदोलन निवेदन यामध्ये सहभाग घेतला असून आज राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीने त्यांच्या कामाची दखल घेत यशवंत पवारांना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अतिरिक्त सचिव आणि महाराष्ट्राचे सह-प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे .

कोण आहेत यशवंत पवार ?

यशवंत पवार हे साप्ताहिक कार्यसम्राट चे मुख्य संपादक असून त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक वंचित पिडीत घटकांना जे प्रशासन समोर हतबल झाले अश्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम पवारांनी केले असून त्यांनी “पत्रकारिता एक वसा एक चळवळ एक ध्यास समझुन” गेले जवळपास ५ वर्षे झाली पत्रकार सुरक्षा समिती नावाने पत्रकार संघटनेची स्थापना केली होती , पवार हे संस्थापक अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष अश्या दोन आघाडीवर काम करत आहेत आज त्याच संघटनेला महाराष्ट्र राज्यातील तसेच गुजरात मध्ये देखील पत्रकारांनी मोठी साथ दिली असून यशवंत पवार यांचा महाराष्ट्र राज्यात मोठा गाजावाजा असून पत्रकारांमध्ये पवारांनी आपल्या धारदार परखड लेखणी ने पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर निवेदन उपोषण आंदोलन अश्या विविध पद्धतीचा लढा देत एक आगळेवेगळे स्थान आज निर्माण केले असून त्यांनी आजवर पत्रकारांच्या विविध प्रश्नांनसह सर्वसामान्य माणसांना देखील न्याय मिळवून देण्याचे काम पवार यांनी केले आहे , माझा जन्म पत्रकारांच्या व सर्वसामान्य माणसांच्या कल्याणासाठी झाला असून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहीन असा मानस पवारांचा आहे

असा होता यशवंत पवारांचा आजवरचा लढा

पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात यशवंत पवारांनी आपली पकड चांगलीच मजबूत केली असून नेहमीच पवार हे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर , यूट्यूब पोर्टल ला शासकीय मान्यता मिळणेबाबत पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्याबाबत साप्ताहिकांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती , पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटं गुन्हे , पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी अश्या विविध प्रश्नांवर यशवंत पवारांनी आजवर लढा दिला असून आपले जीवन हे पत्रकारांच्या व सर्वसामान्य माणसांच्या कल्याणासाठी समर्पित केले असून त्यांनी नेहमीच पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर तसेच वंचित पिडीत घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले असून यापुढेही लढा असच आक्रमक व दमदारपणे कायम चालू ठेवू ,असा विश्वास राज्यातील पत्रकारांना दिला आहे

“या” जबाबदारीला / पदाला देखील मी पूर्णपणे न्याय देईन

नुकतेच पत्रकार सुरक्षा समिती चे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांची राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अतिरिक्त सचिव आणि महाराष्ट्राचे सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आजपर्यंत पवार हे वंचित पिडीत घटकांसह महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आपल्या धारदार लेखणीने प्रशासनावर आसूड ओढून न्याय मिळवून देण्याचे काम केले असून आता राष्ट्रीय महास्वाराज भूमी पार्टीने नवी जबाबदारी दिली असून त्या पदाला त्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार असून सर्वसामान्यांसह पत्रकारांच्या प्रश्नांवर आणखीन आक्रमकपणे काम करणार असल्याचे यशवंत पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *