संग्रामसिंह जहागिरदार यांच्या शुभाहस्ते पिलीव येथे त्रिमुर्ती फोटोग्राफी व गिफ्ट हाऊसचे उद्धघाटन.. !

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे अनेक दिवसापूर्वी देवानंद गोंजारी यांनी त्रिमुर्ती फोटो स्टुडीओ सुरु केला होता.त्याच स्टुडीओचा विस्तार वाढवून पिलीव व पंचक्रोशीतील ग्राहकांना बदलत्या युगाला अणुसरुन सेवा देण्यात यावी म्हणून देवानंद गोंजारी यांचे चिरंजीव श्रेयश(बबलू)देवानंद गोंजारी यांनी डिजीटल फोटोग्राफीच्या दृष्टिकोणातून त्रिमुर्ती फोटाग्राफी & गिफ्टहाऊसचे पडळकर कॉम्प्लेक्स येथे नव्याने दुकान थाटले आहे.याच दुकानाचे आज रविवार दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांच्या शुभाहस्ते उद्धघाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटी,सरपंच नितीन माळी,उपसरपंच संजय आर्वे,अविनाश जेऊरकर,शिवराज पुकळे,कामत सर,संतोष पडळकर,समशेरसिंग राजपूत,मोहसिन शेख,तानाजी लोखंडे,गोरख पिसे,विजय सगरे,बंडू स्वामी,दिनेश बोडरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *